vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबईत बांधकाम स्थळांवरील डासउत्पत्ती स्थानांवर कार्यवाहीची विशेष मोहीम..

नवी मुंबईत बांधकाम स्थळांवरील डासउत्पत्ती स्थानांवर कार्यवाहीची विशेष मोहीम..

     नवी मुंबई प्रतिनिधी    नवी मुंबई शहर हे खाडीकिनारी वसलेले सुनियोजीत शहर असून इतर शहरांना रेल्वे व रस्त्याद्वारे नियोजीतपणे जोडलेले आहे. येथील नागरी वसाहत दिवसांदिवस वाढत आहे. तसेच घरांच्या वाढत्या मागणीप्रमाणे नवीन रहिवासी इमारतींची तसेच पुनर्बांधणीची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत.

         बांधकामातील साचलेल्या पाण्यामुळे हिवताप / डेंग्यू यासारख्या आजार पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती होण्याची दाट शक्यता असते, यासाठी सदर ठिकाणी डासउत्पत्ती रोखण्याकरिता नमुंमपामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जातात.

         नागरी प्राथमिक आरोग्य केंदाच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात आरोग्य विभागामार्फत डासअळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरणाचे काम केले जाते. परंतू यासोबतच पावसाळा कालावधीत घरांतर्गत डासोत्पत्ती स्थाने तपासणी व बांधकामांमध्ये डासअळीनाशक फवारणी यावर विशेष भर दिला जातो.

        नमुंमपा आरोग्य विभागामार्फत बांधकामाच्या ठिकाणी नियामित साप्ताहिक वेळापत्रकानुसार डासअळीनाशक फवारणी केली जाते. 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय असलेल्या बांधकामाच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नवी मुंबईत 270 बांधकामे सुरु आहेत, यापैकी 1 ते 50 बांधकाम मजूर संख्या असलेली 152 बांधकामे, 51 ते 100 बांधकाम मजूर असलेली 45 बांधकामे, 100 पेक्षा जास्त बांधकाम मजूर संख्या असलेली 40 बांधकामे आणि मजूर नसलेली परंतू बांधकाम सुरु होण्यापूर्वी खड्डा खोदून ठेवलेली एकूण 33 बांधकामे आहेत.

 

      बांधकामांच्या ठिकाणी खालीलप्रमाणे उपाययोजना केल्या जातात –

· बांधकामाच्या ठिकाणी नियमित कॅम्पचे नियोजन.· बांधकामां अंतर्गत मजूरांच्या झोपड्यांमध्ये पावडर फवारणी.· बांधकामांमध्ये नियमित ग्रॅन्युअल ट्रीटमेंट करणे.· गप्पी मासे सोडणे इत्यादी उपाययोजना केल्या जातात.      बांधकाम कार्यक्षेत्रात एकूण 270 बांधकामांमध्ये 265 ठिकाणी गप्पी मासे सोडले असून मागील तीन महिन्यांमध्ये एकुण 3560 बांधकाम मजूरांच्या घरांमध्ये पावडर फवारणी करण्यात आली आहे. 270 बांधकामांमध्ये 14390 कामगार काम करीत आहेत.

         नियमित डासअळीनाशक फवारणी झाल्यावर सदर कामाची फेरतपासणी पर्यवेक्षक व अधिकारी यांचेमार्फत केले जात असून सदरचे काम प्रभावी होईल याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

         तरी आरोग्य विभागाच्या कार्यवाहीसोबतच नवी मुंबईकर नागरिकांनी घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने नष्ट करणे तसेच आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, आजुबाजूचा परिसर / टेरेसवरील भंगार नष्ट करणे आदी बाबींवर लक्ष दिले तर नवी मुंबईत हिवताप / डेंग्यू आजारावर आळा घालणे शक्य होईल असे आवाहन महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील व महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी  कोकिलाबेन अंबानी यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू

विविध योजनांचा लाभ घेण्याचे वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जमाती विकास महामंडळाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पादत्राणे व्यावसायिकांना गटई स्टॉल चे वाटप

डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर चर्मकार समाजातील वधु वर मेळावा संपन्न…

कुचीत विकसित कृषि संकल्प अभियान उत्साहात संपन्न

मौजे कुंभरोशी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” संपन्न..