vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईत DRI ची कारवाई, नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरावर १२५ कोटींचे ड्रग्स सापडले.

मुंबईत DRI ची कारवाई, नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरावर १२५ कोटींचे ड्रग्स सापडले.

मुंबई :  प्रतिनिधी  मुंबईत आणखी २५ किलोहून अधिक हेरॉइन ड्रग्ज  जप्त करण्यात आले आहे. डीआरआयच्या मुंबई झोनल युनिटने  नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरावर छापा टाकला. यावेळी हे ड्रग्स मिळाले असून याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १२५ कोटी असल्याचे सांगितले जात आ

डीआरआयच्या मुंबई झोनल युनिटला अंमली पदार्थाची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर झोनल युनिटने नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरावर छापा टाकला. यावेळी एका कंटेनरमध्ये तब्बल २५ किलोहून अधिक हेरॉइन आढळून आले. पोलिसांनी हे ड्रग्स जप्त केले असून येथून एका व्यावसायिकाला देखील अटक करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी गुजरात येथील कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरावर १६ सप्टेंबर रोजी महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या छापेमारीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले होते. दोन वेगवेगळ्या कंटेनरमध्ये प्रक्रिया केलेल्या टाल्क स्टोनच्या आवरणाखाली तब्बल २,९८८ किलोग्रॅम हेरॉईन ड्रग्ज सापडलं. अंमली पदार्थांची तस्करी करणारी ही जहाजं अफगाणिस्तानमधून इराणमार्गे भारतात पाठवण्यात आली होती. यानंतर अनेकांनी राजकीय टीका-टीप्पणी देखील केली होती.

 

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 3 महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत ज्यामध्ये देशात समान नागरी कायदा आणावा, लोकसंख्या नियंत्रणाबाबत कायदा करावा आणि औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावंं…. मनसे अध्यक्ष राज ठाकरे

आज ठाण्यामध्ये रश्मी उद्धव ठाकरे , सालाबादप्रमाणे यंदाही घेणार टेंभीनाका येथील देवीचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

तर्कतीर्थांच्या पिंपळनेर गावी साजरा होणार वाचन प्रेरणा दिन मराठी भाषा विभागाचा उपक्रम..

vishwatmaklokswamivarta

भीमा कोरेगाव हिंसाचार  प्रकरणा तिल फादर स्टेन  यांच्या संगणकामध्ये हॅकरने प्लांट केली 44 आक्षेपार्ह कागदपत्रे- रिपोर्ट..

vishwatmaklokswamivarta

इंदुमिल मधील स्मारकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वाधिक उंच पुतळा उभा राहणार त्याप्रमाणे चैत्यभूमी चा स्तूप ही दीक्षाभूमी सारखा भव्य उभारण्यात यावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

vishwatmaklokswamivarta

हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध व काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

vishwatmaklokswamivarta