vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबादेवी तील कोळी बांधवांनी घेतले मुंबादेवी चे दर्शन..     

मुंबादेवी तील कोळी बांधवांनी घेतले मुंबादेवी चे दर्शन..          मुंबई : प्रतिनिधी कोरोना काळानंतर सालाबादाप्रमाणे मुंबईतील कोळी बांधवांनी मुंबादेवी येथील मुंबादेवी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. मुंबईचा प्रथम नागरिक असलेल्या कोळी समाजाने कालबादेवी येथे जाऊन मुंबादेवी मातेचे दर्शन घेतले आणि मुंबईतील सर्व जनतेला सुखी आणि समाधानी ठेव आशीर्वाद घेतले. सदरचा उपक्रम मुंबादेवी (मुबई) रोहिदास कोळी अध्यक्ष कोळी महासंघ मुंबई यांनी एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्व भूमिपुत्र आगरी कोळी भंडारी आणि मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.मुबंई च्या 200 कोळीवाडा गावठाणांना गलिच्छ वस्त्या म्हणजेच एस आर ए ठरविण्याचा निर्णय 2016 -17 मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारने घेतला. यानंतर येथील भूमीपुत्रांच्या 2000 वर्षे जुन्या अस्तित्वाचा शोध सुरू झाला.मुबंई चे आद्य रहिवाशी हे आगरी कोळी भंडारी आदिवासी आहेत त्यांना जमीन हक्क नाकारला जातोय तोही महाराष्ट्राच्या विधिमंडळात…..?यातून सरकार विरोधी संघर्ष सुरू झाला. आमच्या जमीन हक्कांची सुरुवात रायगडात डॉ बाबासाहेब आबेडकर आणि नारायण नागु पाटील यांनी केली होती.”वहिवाट आणि जमीन कसने” हाच परिस्थिती जन्य पुरावा आधार मानून जमिनीची मालकी निश्चित करण्यात आली. तत्कालीन सरकारने भूमिपुत्रांवर अन्याय केला होता. वरळी येथील सभेत तत्कालीन सरकारला याचा जाब विचारण्यात आला! यातूनच पुढे गावठाण शिमांकन चळवळ सुरू झाली.2000 वर्षांपूर्वी जी मंदिरे स्त्री देवतांची आहेत ती हुंडा नाकारणाऱ्या मातृसत्ताक सागरपुत्र समाजाची आहेत हे तर्कनिष्ठ दृष्टिकोन सारे जग मान्य करिल!अर्थात जागतिक व्यापारी असलेल्या मच्छिमार बांधवांची माहिती जगाच्या इतिहासकरानी गझेट मध्ये लिहिली आहेच. मुंबादेवी हे आमचे मंदिर आहे त्याचे आजचे व्यवस्थापन मंडळ हे त्यांच्या आडनावं पाहता आगरी कोळी भंडारी आदिवासी ईस्ट इंडियन यांच्या पैकी नाही हे कुणीही सांगेल!आज मुबई महानगर पालिकेच्या राजकीय नेतृत्वातून आमचा समाज जसा दूर फेकण्यात आला तसेच मंदिरांचे व्यवस्थापन बदलले गेले. असे रोहिदास कोळी यांनी यावेळी सांगितले. अर्थात घरात आणि मंदिरात स्त्रियांना मानाचे स्थान लग्नात हुंडा नाकारणारे मातृसत्ताक कोलीय वंशाचे लोक देऊ शकतात हे पुरुषसत्ताक मनुवादी संघर्षाच्या इतिहासात सिद्ध झालेय. येथे दोन मातांच्या मुर्त्या आहेत.जसे कार्ला येथे एकविरा आई आणि प्रजापिता (संन्यस्त)आई आहे.ज्यांनी आज मुबामातेचे चे मंदिर व्यवस्थापन जपले आहे त्यांचे आभारच मानले पाहिजेत.परंतु येथील मच्छीमारांची वहिवाट जपली पाहिजे.मंदिर भेटीचा हा मुख्य उद्देश आहे.मुबंई च्या गावठाण हक्कात मंदिरांचा पुरावा हा महत्वाचा भाग ठरणार आहे.आज प्रत्येक गावात किमान चार ते पाच मंदिरे आहेत.यांच्या नोंदी मंदिर ट्रस्ट कायदा नोंदी आणि लिखित इतिहास सांगू न शकल्याने सिडकोने नवी मुबंई त 100 च्या वर मंदिरे अनधिकृत ठरवून मौल्यवान जागा लुटल्या आहेत.मंदिरातील अर्थकारणाची माहिती घेऊन त्यावर ताबा मिळविणे हा पुरोहितशाही आणि उच्चजातीचा शोषक इतिहास प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी लिहिला आहे.कार्लानिवासी एकविरा आईच्या दानपेटीवर दावा करणारे उच्चवर्णीय पुजारी ट्रस्टी झाले.म्हणूनच मुबादेवी आंदोलना निमित्त ठाणे रायगड मुबई पालघर येथील मातृसत्ताक ग्रामदेवता यांचा इतिहास,व्यवस्थापन गावकमिटी स्थापन करून धर्मादाय आयुक्त,जिल्हाधिकारी ,भूमी अभिलेख,पुरातत्व विभाग येथे नोंदी घेणे ही काळाची गरज आहे.नवी मुबई विमातळातील केरुमाता लेणी ही एकविरा आई सारखीच वास्तू विकासाच्या नावे सिडकोने तोडली आणि आगरी कोळी कराडी गावेही!गावठाणे वाचवताना आम्ही मंदिरे वाचविण्यासाठी लढले पाहिजे, असे भूमिपुत्र राजाराम पाटील यांनी सांगितले. मुंबादेवी एकविरा जीवदानी माता,शितळामाता,गावदेवी,महालक्ष्मी मातृसत्ताक संस्कृती ही स्त्रियांना अधिकार देणारी विचारधारा आहे.भारतीय संविधानात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म स्वातंत्र्य, धार्मिक प्रतीके वास्तू जपण्यासाठी स्वतंत्र कलमे लिहिली आहेत.ती आज या मंदिराची प्रॉपर्टी कार्ड आणि गावठाणे निश्चित करताना उपयोगी पडतात खर म्हणजे यासाठी मंदिरे लेणी किल्ले पुरातन वास्तू जपू पाहणाऱ्या सर्वांनीच संविधान कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल कायम ऋणी राहिले पाहिजे!पुढील काळात मंदिराच्या जमीन मालकी साठी आम्ही प्रत्येक कोळीवाडा गावठाणात जाऊन हा इतिहास शासनाच्या निदर्शनास आणणार आहोत . मुंबा देवी मंदिराच्या भेटीत रोहिदास कोळी.कुलाबा मुबई.अध्यक्ष कोळी महासंघ मुबई शहर, आमदार रमेश दादा पाटील अध्यक्ष कोळी महासंघ महाराष्ट्र,

राजाराम पाटील भूमी पुत्र कोळी आगरी समाज,

दिलीप पागधरे नेते कोळी समाज,

भगवान भांजी, कोळी नेते,

सचिन ठाणेकर नेते कोळी समज अभ्यासाक,

राजहंस टपके सरचिटणीस कोळी महासंघ,

हिरा वाडकर, सुहास कोलापकर, अनंत कालेकर, स्वप्नील कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्हा कारागृहातील बंद्यांना-जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न 

गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यासाठी शासनाची जोरदार तयारी- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची घोषणा…

दि.5ऑगस्ट रोजी पनवेल येथे जनता दरबाराचे आयोजन ….       

मी मतदानाचा अधिकार बजावणार’ – स्वाक्षरी फलकाव्दारे मतदान जागरुकतेचा संदेश प्रसारण नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते मतदान जागरुकता स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ..

लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेशमधून विजयी झालेल्या सर्व 37 खासदारांचे स्वागत करण्यासाठी 19 जुलै रोजी मुंबईत विजय उत्सव आयोजित करण्यात आला आहे – अबू आसिम आजमी

शेतीवर आधारित उपप्रकल्प करावेत*-माविम व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शाह मुंबई*