vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य पश्चिम रेल्वेवरील रविवारी मेगाब्लॉक नाही

6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य पश्चिम रेल्वेवरील रविवारी मेगाब्लॉक नाही

मुंबई प्रतिनिधी   : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या  पार्श्वभूमीवर रविवारी (ता. ५) मध्य, पश्चिम रेल्वेवरील  मेगाब्लॉक नसणार  आहे. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात; मात्र गेल्या वर्षी कोरोनामुळे अनुयायांना चैत्यभूमी येथे जाता आले नाही.

यंदा कोरोना नियमांचे पालन करून चैत्यभूमीवर येण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे गर्दीचे विभाजन करण्यासाठी रविवारी (ता.५) मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कल्याण आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल या मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. दरम्यान, पश्चिम रेल्वेवरही रविवारी (ता. ५) दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल. शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री वसई रोड ते विरार दरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवार-रविवारच्या, (ता.6) रोजी मध्यरात्री सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल दरम्यान अप आणि डाऊन विशेष आठ फेऱ्या धावणार आहेत. कल्याण ते सीएसएमटी विशेष लोकल कल्याण येथून रात्री 1 वाजता सुटेल. ही लोकल सीएसएमटी येथे रात्री 2.30 वाजता पोहोचेल. कल्याण- सीएसएमटी विशेष लोकल कल्याण येथून रात्री 2.15 वाजता सुटेल. ही लोकल सीएसएमटी येथे रात्री 3.45 वाजता पोहोचेल.सीएसएमटी ते कल्याण विशेष लोकल सीएसएमटी येथून रात्री 1.30 वाजता सुटेल. ही लोकल कल्याण येथे रात्री 3 वाजता पोहोचेल.

सीएसएमटी ते कल्याण विशेष लोकल सीएसएमटी येथून रात्री 2.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे पहाटे 4 वाजता पोहोचेल.पनवेल ते सीएसएमटी विशेष लोकल पनवेल येथून रात्री 1.15 वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे रात्री 2.35 वाजता पोहोचेल. पनवेल ते सीएसएमटी विशेष लोकल पनवेल येथून रात्री 2.30 वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे रात्री 3.50 वाजता पोहोचेल.सीएसएमटी ते पनवेल विशेष लोकल सीएसएमटी येथून रात्री 1.40 वाजता सुटेल. ही लोकल पनवेल येथे रात्री 3 वाजता पोहोचेल.सीएसएमटी ते पनवेल विशेष लोकल सीएसएमटी येथून रात्री 2.40 वाजता सुटेल. ही लोकल पनवेल येथे पहाटे 4 वाजता पोहोचेल.

 

संबंधित पोस्ट

निवडणूक निकालावर परिणाम करणाऱ्या बाबी-प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाची मनाई

vishwatmaklokswamivarta

विरोधकांच्या बंगळुरु येथील बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष अध्यक्ष शरद पवार राहणार अनुपस्थित….

550 हून अधिक मंदिर प्रतिनिधींच्या उपस्थितीत ओझर (जिल्हा पुणे) द्वितीय परिषदेला उत्साहात प्रारंभ !शरीरात प्राण असेपर्यंत मठ-मंदिरे आणि सनातन धर्म रक्षण करण्याचा प्रण घ्या ! – महंत सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर, नाशिक

vishwatmaklokswamivarta

सायरस मिस्त्री मृत्यू :सूर्या नदीवरील पुलावर झालेल्या अपघाताचं गूढ जर्मनीत उलगडणार? पालघर पोलिसांनी दिली महत्त्वाची माहितीमिस्त्री हे पंडोल कुटुंबियांसह अहमदाबादहून मुंबईकडे मर्सिडीज कारने येताना झालेल्या या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला

vishwatmaklokswamivarta

खेळाडूंच्या जडणघडणीसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसह उत्तम पायाभूत सुविधा देण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद फडणवीस ७५ व्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात उलगडणार महाराष्ट्र घडविणाऱ्या संत, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास