vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई हादरली, 19 वर्षीय तरुणीवर चौघांचा सामूहिक बलात्कार, – शिवाजी नगर सामूहिक बलात्कार प्रकरणी चारही आरोपींना अटक..

मुंबई हादरली, 19 वर्षीय तरुणीवर चौघांचा सामूहिक बलात्कार, – शिवाजी नगर सामूहिक बलात्कार प्रकरणी चारही आरोपींना अटक…

 

:शिवाजी नगर परिसरात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील दोघेजण अल्पवयीन असल्याची माहिती शिवाजी नगर पोलि स ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अर्जुन राजाणे यांनी सांगितले. पीडित मुलीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी ४ जणांविरुद्ध कलम ३७६,३७६ (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांना ओळखतात. पीडित मुलगी पहाटे साडेचारच्या सुमारास केटरिंगचे काम करून घरी परत येत होती. त्यावेळी शिवाजी नगर जुन्या बस डेपोजवळ हे चार आरोपी थांबले होते. निर्जनस्थळ असल्याने यातील एका आरोपीने मुलीची वाट अडवून “तू आता कुठून येत आहेस?” अशी विचारणा केली.

 

मुलीन कॅटरिंगचे काम करून परतत असल्याचे सांगितलं. तेव्हा एक आरोपी बोलायचे आहे असे सांगून आडोशाला असलेल्या झोपडीत घेऊन गेला. त्याच्या पाठोपाठ इतरही आरोपी आले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. मुलीने आरडा ओरडा करण्याचा प्रयत्न केला असता. एका आरोपीने तिचे तोंड दाबून धरले होते. पीडित मुलीने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून याबाबत मदत मागितली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपासाला सुरवात केल्यानंतर या प्रकरणातील दोन आरोपी उत्तरप्रदेशला जाण्याच्या प्रयत्नात असताना दोघांना सापळा रचून डोंगरी परिसरातून ताब्यात घेतले. त्यानंतर सकाळी उर्वरित दोघांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचं महाविकास आघाडीला पत्र; कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन

vishwatmaklokswamivarta

अहमदनगर चौंडी येथे धनगर समाजाचे 21 दिवसापासून सुरू असलेले उपोषण अखेर मागे, मागण्या मान्य करण्याचे आश्वासन…

vishwatmaklokswamivarta

प्रमुख स्वामी महाराजांची १०३ वी जयंती आणि BAPS चा ‘कार्यकार सुवर्ण महोत्सव’ दोन्ही साजरे,भगवान स्वामीनारायणापासून सुरू झालेल्या BAPS संस्थेने केवळ भक्तीवरच भर दिला नसून समाजसेवेची जोडही समाजात रुजवली-अमित शहा केंद्रीय गृहमंत्री

vishwatmaklokswamivarta

कृषी विभागाने पात्र लाभार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना योजनांचा लाभ द्यावा- राज्यमंत्री आशिष जयस्वाल,साधनसंपत्तीच्या स्त्रोतांचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्यासाठीच्या समितीची पहिली बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडीलयोजनेच्या लाभासाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संवाद- समन्वय आवश्यक-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी