vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यात लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार, अजित पवारांना प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

राज्यात लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार, अजित पवारांना प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा….

मंत्रालय पुणे प्रतिनिधी

राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती

राष्ट्रवादीला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर मंत्रीमंडळ विस्ताराची घोषणा केली आहे.

मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुद्यावरुन विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार स्थापन होवून महिना उलटून गेला तरी मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही आणि मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री दोघांनीचं मिळून 700 हून अधिक जीआर (GR) काढले आहेत. तरी मंत्रीमंडळाचा मुहूर्त कधी असा सवाल अजित पवारांनी शिंदे सरकारवर उपस्थित केला आहे. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्रात सरकार होऊन आता महिना पूर्ण झाला तरीही खातेवाटप झालेलं नाही, हे ‘एक दुजे के लिए’ असे दोघांचेच सरकार असल्याची खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी  केली आहे.

राष्ट्रवादीला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर मंत्रीमंडळ विस्ताराची घोषणा केली आहे. आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होती. विरोधीपक्ष नेते प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले सरकारमध्ये दोघचं असलो तरी काम व्यवस्थित सुरु आहे. आम्ही पेट्रोलचे (Petrol) दर कमी केलेत, वीजेच्या (Electricity) दरात कपात केली, पूग्रस्त (Flooded Region) भागात जावून  स्वत शेतकऱ्यांची चौकशी केली. दोघांचं सरकार असलं तरी आम्ही कुठेही कमी पडलो नाही आणि राहीला प्रश्न  मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा तर राज्य मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार अशी घोषणा खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली

राज्यात नवीन सरकार स्थापन होवून एक महिना पूर्ण झाला तरी देखील मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त काही निघालाचं नाही. फक्त राज्याची जनताचं नाही तर भाजपातील (BJP) आमदारासह शिंदेगटातील आमदार देखील मंत्रीमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत आहेत. शिंदे सरकारवर मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुद्दयावरुन दररोज विरोधकांकडून ताशेरे ओढले जातात. तरी राज्यात मंत्रीमंडळाचं भिजत घोंगडचं आहे. फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघं मिळून संपूर्ण राज्याचा कारभार बघत आहेत. तरी आज मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर आता लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होईल अशी महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा आहे.

 

संबंधित पोस्ट

पुण्यात जन आक्रोश मोर्चा बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख च्या सर्व मारेकरांना फाशी द्यावी प्रमुख मागणी पर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही खासदार सोनवणे

vishwatmaklokswamivarta

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त मतदार जनजागृतीसाठी प्रदर्शन जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी पालीमकर यांच्या उपक्रमशीलतेला दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख क्रमांक:-उद्योजकांना उद्योजकांकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाच्या विविध कर्ज योजना

vishwatmaklokswamivarta

जगाचं लक्ष लागून असलेल्या मिस वर्ल्ड 2021, स्पर्धेवर देखील ओमिक्रॉनचं  सावट ,या स्पर्धेचा ग्रँड फिनाले  स्थगित 

vishwatmaklokswamivarta

पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम २०२४ साठी३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात पुणे जिल्ह्याने खेळाला दिले प्राधान्य; स्पर्धेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद – उपमुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta