
मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्ग वर्षभरात ‘सुरक्षित’ होणार; लवकरच ‘इंटिलिजेंट मॅनेजमेंट ट्राफिक सिस्टीम’ बसविणार‘एमएसआरडीसी’कडून कार्यादेश जारीच; वाहनचालकांवर करडी नजर राहणार
नवी मुंबई प्रतिनिधी: शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अखेर सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) बसविण्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) मुहूर्त सापडला असून यासंबंधीचे कार्यादेश संबंधित कंपनीला देण्यात आले आहेत. महामार्गावर नऊ महिन्यांमध्ये यंत्रणा बसविण्यात येणार असून त्यानंतर महिन्याभर या यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे. एकूणच वर्षभरात अत्याधुनिक अशी ‘आयटीएमएस’ यंत्रणा कार्यान्वित होऊन वाहतुकीला शिस्त लागेल, वाहनचालकांवर करडी नजर राहील आणि अपघात रोखले जातील असा विश्वास एमएसआरडीसी कडून व्यक्त करण्यात येत



