vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

कुख्यात गुन्हेगार संजय कारलेचा मृतदेह बंद कारमध्ये आढळल्याने खळबळ मुंबई गोवा हायवेवर कर्नाळा अभयारण्य जवळ .

कुख्यात गुन्हेगार संजय कारलेचा मृतदेह बंद कारमध्ये आढळल्याने खळबळ मुंबई गोवा हायवेवर कर्नाळा अभयारण्य जवळ .

 

नवी मुंबई प्रतिनिधी

मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्य जवळ १८ नोव्हेंबर २०२२ ला पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीत एका बंद ऑडी कार मध्ये मावळमधील तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपी संजय मारुती कारले ( रा. अनिकेत अपार्टमेंट, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे) याचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

संजय कारलेवर तळेगावमध्ये गुन्हा नोंद

संजय कारलेवर तळेगाव – दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 656/2018 भादवि कलम 420, 354, 506 व मोका अन्वय गुन्हा दाखल आहे.या दाखल गुन्ह्यात नमूद आरोपी हा सहा महिन्यांपूर्वी वैद्यकीय रजेवर मुक्त झाला होता व त्यानंतर त्याला कायमस्वरूपी जामीन मिळाला होता.

ज्या कारमध्ये संजय कारलेचा मृतदेह आढळला ती कार क्रमांक एमएच १४ जी. ए. ९५८५ या क्रमांकाची आहे. केंद्रीय मंत्री यांच्या फार्म हाऊसजवळ ही कार मागच्या दोन दिवसांपासून होती. या कारमध्ये संजय कारलेचा मृतदेह आढळून आला. ही कार पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे भागातली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. ही कार लॉक असल्याने मृतदेह बाहेर काढम्यात पोलिसांना अडचणी येत होत्या.मात्र तज्ज्ञांच्या मदतीने कारचे दार उघडण्यात यश आलं. या कारमध्ये संजय कारलेचा मृतदेह आढळून आला. त्याच्या छातीवर गोळ्या झाडल्याच्या खुणा आहेत. या ठिकाणी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती

संबंधित पोस्ट

तिहार जेलमध्ये गँगवार, तुरुंगात प्रतिस्पर्धी टोळीकडून टिल्लू ताजपुरियाची हत्या..

अपहरण झालेल्या मुलीबद्दल माहिती असल्यास पोलिस विभागास संपर्क साधण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

२५ तलवारींसह नांदेड पोलिसांनी केली दोन आरोपींना अटक,धुळ्यापाठोपाठ नांदेडमध्ये आढळल्या तलवारी.

मुंबईत 500 रुपयांवरून झाला वाद, रागातून एकाची हत्या…

vishwatmaklokswamivarta

40 कोटींच्या संपत्तीचा मोह, बापलेकीने आईला संपवलं, हायप्रोफाईल मर्डर

vishwatmaklokswamivarta

NIAने अटक केलेल्या डी गँगच्या दोन हस्तकांच्या टेरर फंडिंग’मागे  राजकीय कनेक्शन, NIAच्या तपासात उघड