vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा – आर.आर. पाटील 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा – आर.आर. पाटील 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन..

 

गडचिरोली प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी. शुक्ल यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्यावतीने दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी शनिवारला राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली तसेच तालुका न्यायालय, अहेरी, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी दावे असे प्रलंबित वाद तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. यासाठी पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोठया प्रमाणात आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य यांनी केले आहे.

 

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, 138 एन.आय.अॅक्ट प्रकरणे, भु-संपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन,मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, पंतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, नगर परिषद व ग्रामपंचायत अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश असणार आहे. लोकन्यायालयात पारीत झालेल्या अवॉर्डची न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे अंमलबजावणी करता येते. लोकन्यायालयात तडजोड केल्याने लोकांचा वेळ, श्रम व पैसा यांची बचत होते. दोन्ही पक्षकारांमध्ये असलेले वैर संपुन गोडवा, चांगले संबंध निर्माण होतात.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई मार्फत संपुर्ण राज्यात 9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे नियोजन केले आहे. तरी सर्वांनी दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी होणा-या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन सचिव आर.आर. पाटील यांनी केले आहे.

*******

संबंधित पोस्ट

२४ ते ३० जून या कालावधीत गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !श्रीराम मंदिरानंतर आता ‘हिंदु राष्ट्रा’साठी संघटित प्रयत्न आवश्यक! – सतीश कोचरेकर, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समितीमुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ३५ विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे एकूण ७५ प्रतिनिधी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सहभागी होणार !

vishwatmaklokswamivarta

संसदेत कोरोनाचा प्रभाव; पंतप्रधान मोदी आणि इतर खासदारांनी राज्यसभेत कामकाजादरम्यान घातला मास्क

vishwatmaklokswamivarta

महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

महाविकास आघाडीत खळबळ, शरद पवार अमित शाहांच्या भेटीला? राष्ट्रवादीने दिलं स्पष्टीकरण

vishwatmaklokswamivarta

महाशिवरात्रीनिमित्त देशभरातल्या शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरू करण्याचे परिपत्रक जारी…