vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईत आगामी काळात अतिवृष्टीत मुंबई डुबली, बुडली हे चित्र दिसणार नाही,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

मुंबईत आगामी काळात अतिवृष्टीत मुंबई डुबली, बुडली हे चित्र दिसणार नाही,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

राज्य प्रतिनिधी

अतिवृष्टी झाल्यास पृष्ठभागावर साचलेले पाणी भूगर्भात साठवण्याची व्यवस्था जपानच्या टोकियो शहरात  आहे. त्यामुळे तेथे पाणी तुंबत नाही. जपान सरकारच्या मदतीने मुंबईत तशी योजना आम्ही करणार आहोत. ही व्यवस्था निर्माण झाल्यास आगामी काळात अतिवृष्टीत मुंबई डुबली, बुडली हे चित्र दिसणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

‘ए’ वॉर्डातील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील सुरक्षा उद्यान व मादाम कामा मार्गावरील जवाहरलाल नेहरू उद्यान या सुशोभीकरण केलेल्या दोन्ही उद्यानांचे लोकार्पण रविवारी फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना मुंबई पूरमुक्त करण्यासाठी आखण्यात येणाऱ्या योजनेची त्यांनी ही माहिती दिली. मुंबईत २० चौरस मीटर क्षेत्रफळातील उद्याने विकसित केली जाणार असल्याचे सांगत, मेट्रो प्रकल्प, ट्रान्स हार्बर लिंक, सागरी सेतू, सागरी मार्ग या प्रकल्पांच्या सद्य:स्थितीची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली

 

संबंधित पोस्ट

मुंबईकरांची विशेष बातमी ,बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी2 जुलैपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार- जितेंद्र भोळे

टीबी हारेगा, देश जितेगा” ही मोहीम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवावे-मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

उच्च व तंत्र शिक्षण विभाग डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : मतदान करिता मुंबईत मेट्रो आणि बेस्ट सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार…

vishwatmaklokswamivarta

धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची झाली स्थापना…

vishwatmaklokswamivarta