vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन.

 

 

 

मुंबई, दि. 6 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

 

दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, माजी खासदार नरेंद्र जाधव, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिकेतर्फे प्रकाशित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पाऊलखुणा’ ही माहिती पुस्तिका मान्यवरांना भेट देण्यात आली.

संबंधित पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विटा नगरपरिषदेचा सन्मान- ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024 सुपर स्वच्छता लीग मध्ये देशात प्रथम- 20 ते 50 हजार लोकसंख्या गटामध्ये कामगिरी- कचरामुक्त शहराचे पंचतारांकित मानांकन

विलीनीकरणाचा अहवाल नकारात्मक आल्यास आंदोलन?

vishwatmaklokswamivarta

माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कामास गती देण्यासाठीसुट्टी दिवशी गर्डर बसवण्याच्या कामास 24 तास परवानगी द्यावी- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग मंत्रालय हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय-ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

vishwatmaklokswamivarta

🌞 🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

उद्या मंगळवार एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता….