vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मतदार राजा जागा हो.. मतदानासाठी सज्ज हो..!

मतदार राजा जागा हो.. मतदानासाठी सज्ज हो..!

 

 

 

ठाणे, प्रतिनिधी :- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदान टक्केवारी वाढविण्याकरिता व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याबाबत मा. भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने ठाणे जिल्ह्यातील २३-भिवंडी, २४-कल्याण व २५-ठाणे या लोकसभा मतदारसंघाकरिता स्वतंत्र स्वीप नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत तसेच जिल्हा कार्यालयातर्फे मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता मतदार जनजागृतीचे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

“मतदार राजा जागा हो मतदानासाठी सज्ज हो” या कार्यक्रमाचा शुभारंभ दि.२५ जानेवारी २०२४ रोजी उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते ठाणे येथील विवियाना मॉल येथे करण्यात आला होता. तसेच दि.१७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता ठाणे येथील कोरम मॉल मध्ये संगीत सध्या आणि प्रश्नमंजूषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले. मतदार नोंदणी करीता नमुना नं.६ चे अर्ज तसेच Voter helpline बाबत माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिकांना मतदार नोंदणी विषयी प्रश्न विचारण्यात आले व मतदार जनजागृतीकरीता तयार करण्यात आलेले कप वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

आगामी काळात देखील असेच जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, असे ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी कळविले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

जिल्हा रुग्णालयातर्फे जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिरास सुरुवात                                         

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवूनच विकास कामे करावीत- मंत्री योगेश कदम

डिजिटल प्रवासाला चालणा देण्यासाठी ‘मुंबई बेस्ट’ची दिवाळी ऑफर..

vishwatmaklokswamivarta

वाशी येथील ‘मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’ मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार !

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात सर्वात युवा चेहरा कुमारी स्नेहा कासारे धारावीच्या प्रभाग क्रमांक 186 मध्ये भरणार फॉर्म…

vishwatmaklokswamivarta

आज सकाळी हार्बर रेल्वे मार्गावर खारकोपर स्थानकाजवळ एक अपघात झाला आहे. सुदैवाने कोणतीही हानी नाही…

vishwatmaklokswamivarta