vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पर्यावरणपूरक शेती साधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प- कृषी मंत्री धनंजय मुंडे

पर्यावरणपूरक शेती साधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प- कृषी मंत्री धनंजय मुंडे

 

राज्य प्रतिनिधी: राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राच्या निरंतर विकासाला प्राधान्य देण्यात आले असून पर्यावरणपूरक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले असल्याची प्रतिक्रिया कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

 

अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. याविषयी कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, कृषी विभागाला 3650 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आलेला आहे. वातावरणीय बदलाला सामोरे जाताना पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी बांबू लागवडीचा पर्याय जागतिक दर्जाच्या संशोधनातून पुढे आला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली असून त्या अंतर्गत 10 हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार आहे.

 

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 7 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी 8 लाख 50 हजार कृषी पंपांची तरतूद करण्यात आली आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत एक लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवरील कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या अन्य योजनांनाही बळकटी देण्यासाठीचे नियोजन व सारासार विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

 

अहमदनगर – बीड – परळी या रेल्वे मार्गाच्या कामास गती देण्यासाठी आवश्यक तरतूद देखील करण्यात आली आहे. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या अंतर्गत ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. विविध समाजघटकांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेल्या आर्थिक विकास महामंडळ व शासकीय संस्थांना भरीव निधीची तरतूद करून खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय साधण्याचे काम अर्थसंकल्पात केले असल्याचेही श्री. मुंडे यांनी म्हटले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

जनसंवादातून सुशासनाकडे’तंत्रज्ञानातून प्रशासन गतिमान करण्याचा जिल्हाधिकारी यांचा अभिनव उपक्रमØ दुर्गम भागातील नागरिकांना दूरदृष्यप्रणालीद्वारे थेट मांडता येतील समस्याØ जिल्हाधिकारी, सिईओ, एसपी व सर्व जिल्हास्तरीय अधिकारी राहणार उपस्थित

राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेसाठी ३४१ शिफारशी…

vishwatmaklokswamivarta

सहज व सोप्या भाषेत संविधानाची माहिती पुस्तक स्वरूपात उपलब्ध – राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर आधारित ‘भारतीय संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार देण्यात येणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘ईज ऑफ डुईंग बिझिनेस’ संदर्भात उद्योग विभागाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

एड्स प्रतिबंधात्मक जाणीव जागृती रॅली- एड्सबद्दल जाणीव जागृतीमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.     

vishwatmaklokswamivarta