vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नागपूरच्या विकासासह दुर्बल घटकांनाही मुख्य प्रवाहात घेऊ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस५५२ कोटी ९३ लक्ष रुपयांच्या विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन

नागपूरच्या विकासासह दुर्बल घटकांनाही मुख्य प्रवाहात घेऊ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस५५२ कोटी ९३ लक्ष रुपयांच्या विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन..

 

राज्य प्रतिनिधी

विकास कामात आघाडीवर असलेले महानगर म्हणून नागपुरकडे पाहिले जाते. भविष्यातील सर्व बाबींच्या गरजा लक्षात घेऊन आपण पायाभूत सुविधांच्या विकासापासून नियोजन केले आहे. विकासाचा हा टप्पा मेट्रोच्या जाळ्यापर्यंत आपण पुढे आणला आहे. या महानगरात काम करणाऱ्या कष्टकरी, दुर्बल घटकातील लोकांनाही विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कटीबद्ध आहोत. मनपाच्या जागेवरील भाडेपट्टा पंजीबध्द झालेल्या झोपडीधारकांना पट्टे वाटप करुन आता स्वत:च्या घराचे त्यांचे स्वप्न साकार करुन दाखवू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

छत्रपती संभाजी चौक (नागोबा मंदिर चौक) आय.टी. पार्क, मेन रोड येथे नागपूर महानगरपालिकेच्या वतीने दक्षिण-पश्चिम नागपूर व पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ येथील सिमेंट काँक्रीट रस्ते, सोनेगांव तलावाचे सौंदर्यीकरण व ई-बसेसचे तसेच विविध आयुष्मान आरोग्य मंदिर लोकार्पण व भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, आमदार सर्वश्री प्रविण दटके, विकास ठाकरे, माजी मंत्री श्रीमती सुलेखा कुंभारे, माजी आमदार नाना शामकुले, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल व पदाधिकारी उपस्थित होते.

 

महानगरात गोरगरीबांना आपल्या घराचे स्वप्न साकार होणे सोपे नसते. शासनाच्या घरकुल योजनांचा लाभ घेण्यासाठी ज्या ठिकाणी ते राहत आहेत त्या जागेची मालकी/पट्टा त्यांच्या नावावर असणे आवश्यक असते. या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने कायद्याच्या चौकटीत हजारो लोकांना पट्टे देऊन आता त्यांचे स्वप्न साकार होण्यास मोलाची मदत केल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेंतर्गत नागपुरात हजारो घरे वंचितांना मिळतील असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. ग्रीन सिटी असणाऱ्या

नागपूर शहरात डिझेल आणि पेट्रोल सारख्या पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापराऐवजी ई-बसेस सारख्या वाहनांचा सर्वाधिक वापर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहरात सुरु असलेल्या इतर बसेस हळूहळू कमी करुन ई-बसेस व अपारंपरिक स्त्रोत व ग्रीन एनर्जीवर चालणाऱ्या बसेसची संख्या वाढवून नागपूर शहराचा देशात नावलौकिक वाढवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

एनएमएमटी बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50% सवलत आज दिनांक 14 ऑक्टोबर 2024 पासून लागू…

vishwatmaklokswamivarta

WHO ची भीती खरी ठरलीच; डेल्टा आणि ओमायक्रॉन मिळून नवा व्हायरस तयार….

लातूर, धाराशिवमधील गावांना भूजल समृद्ध ग्राम पुरस्कार !अटल भूजल योजनेतील स्पर्धेचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

क्रिकेट प्रेमींसाठी अवर्णनीय, अविस्मरणीय आनंदाची पर्वणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडून चॅम्पियन्स चषक विजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन

विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणातील बाधितांना सानुग्रह अनुदान द्यावे – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मिहान प्रकल्पातील पुनर्वसन धोरणानुसार नियोजन करुन सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५४वी बैठक संपन्नराज्याच्या वतीने मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta