vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आवाहन

उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आवाहन

 

 

 

ठाणे, प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने प्रादेशिक हवामान विभागाकडून ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उष्माघातासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी केले आहे.

 

उष्णतेच्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने खालील उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

 

उष्णतेच्या लाटेदरम्यान लहान मुलं व वृद्ध यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेताना या काळात सैल, हलके, फिक्या रंगाचे आणि सुती कपडे परिधान करावेत.

 

• हलके खावे, फळे आणि सलाड सारखे पचायला हलके असणारे अन्न खावे.

 

• पुरेसे पाणी प्या. तहान नसली तरी दर अर्ध्या तासाने पाणी प्यावे.

 

• गॉगल / छत्री/टोपी/बूट/चप्पल घालूनच घराबाहेर पडावे.

 

• प्रवास करताना पाण्याची बाटली आपल्याजवळ बाळगावी.

 

• थंड पाण्याने आंघोळ करावी.

 

• घराबाहेरील उपक्रम / मैदानी उपक्रमादरम्यान थोड्या-थोड्या वेळाने विश्रांती घेत चला व विश्रांतीची वारंवारता वाढवावी.

 

तसेच डोकेदुखी, ताप, उलट्या, जास्त घाम येणे आणि बेशुध्द पडणे, अशक्तपणा जाणवणे, शरीरात पेटके येणे, नाडी असामान्य होणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास काळजी घ्यावी. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी झोपवा, व्यक्तीचे कपडे सैल करा.त्याला द्रव पदार्थ, कैरीचे पन्हे पाजा.

 

तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा. बाधित व्यक्तीला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा आणि वैद्यकीय सल्ला घ्या. अतिकष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत. जेव्हा सूर्यप्रकाश प्रखर नसेल तेव्हाच अशी कामे करा. नागरिकांनी वरील काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

राज्यातील सर्वच क्षेत्रातील असंघटित कामगारांना-केंद्र व राज्याच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाच्या विकास कामांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदिल

मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पूर्व पत्नी आलियाला 3 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta

खानापूरच्या गणेश बुरूजाचे नगरपंचायतीकडे हस्तांतरण जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आदेश सुपूर्द- पुरातन बुरूजाच्या सुशोभिकरणातून शहराच्या वैभवात भर- देखभाल, दुरूस्तीसह वृक्षारोपणाची अट…

vishwatmaklokswamivarta

दिल्लीच्या आरोग्यमंत्र्याना ED कडून अटक होण्याची शक्यता  मुख्यमंत्री केजरीवाल…

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील मोठी दुर्दैवी बातमी- गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली; एकाचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता…

vishwatmaklokswamivarta