
भारतीय सैन्य दलातील अधिकारी पदासाठी मोफत पूर्व प्रशिक्षण
बुलडाणा, प्रतिनिधी भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंबाईन डिफेंस सर्व्हीस या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येते. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात राज्य शासनातर्फे नव-नवयुवतींसाठी दि. 10 जून 2024 ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत कंबाईन डिफेंस सर्व्हीस कोर्स क्रमांक 63 आयोजित करण्यात आला आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भेाजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी बुलढाणा येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दि. 3 जून 2024 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीला येतेवेळी त्यांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर पुणे यांच्या वेबसाइटवर सर्च करून त्यामधील कंबाईन डिफेंस सर्व्हीस कोर्स क्रमांक 63 कोर्ससाठी किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या किंवा व्हाट्सॲप क्रमांक 9156073306 या मोबाइल क्रमांकावर CDS कोर्स क्रमांक 63 हा मेसेज केल्यास संबंधित कोर्सची परिशिष्ट उपलब्ध करून दिली जाईल. शिफारस पत्र आणि त्यासोबत असलेली परिशिष्टची प्रिंट दोन प्रतीत घेऊन व ते पुर्ण भरून सोबत घेऊन यावे.
केंद्रामध्ये कंबाईन डिफेंस सर्व्हीस कोर्ससाठी प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, उमेदवार लोकसंघ आयोग, नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या CDS या परीक्षेकरीता ऑनलाईन अर्ज केलेला असावा, अशी पात्रता धारण केली असावी.
याबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा इमेल training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉड्रन लिडर रूपाली सरोदे यांनी केले आहे.
00000



