vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

शामराव पेजे महामंडळाच्या कर्ज योजनांचा इतर मागासवर्गातील तरुणांनी लाभ घेण्याचे आवाहन

शामराव पेजे महामंडळाच्या कर्ज योजनांचा इतर मागासवर्गातील तरुणांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

 

 

ठाणे, प्रतिनिधी : राज्यातील इतर मागासवर्ग समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने या महामंडळाची स्थापना केली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यावसायिकांना स्वयंरोजगारासाठी रु.1.00 लाखाची थेट कर्ज योजना (नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज नाही) व 20% बीज भांडवल योजना, तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु.10.00लक्ष पर्यत), गट कर्ज व्याज परतावा योजना (10.00 लक्ष ते 50.00 लक्ष पर्यंत) या योजनांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक निशिकांत नार्वेकर यांनी केले आहे.

 

या योजनांची माहिती पुढील प्रमाणे.

 

थेट कर्ज योजना व २०% बीज भांडवल योजना : या योजनांचे अर्ज ठाणे जिल्हा कार्यालयात सशुल्क उपलब्ध आहेत.

 

1. रु.1.00 लक्ष थेटकर्ज योजना : सिबिल क्रेडीट स्कोर किमान ५०० असलेल्या लाभार्थ्यांना सदर कर्ज महामंडळातर्फे दिले जाते. कर्ज परतफेडीचा कालावधी ४ वर्ष आहे. अर्जदाराचे वयाची मर्यादा १८ ते ५५ वर्षे आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज आकारण्यात येणार नाही. मासिक हप्ता रु.२०८५.

 

2. 20% बीज भांडवल योजना : कर्जाची उच्चतम मर्यादा रु.5.00 लक्षपर्यंत. कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्षे आहे. अर्जदाराच्या वयाची मर्यादा १८ ते ५० वर्षे आहे. बँकेमार्फत लाभार्थीना ७५% कर्ज उपलब्ध केले जाते. यामध्ये लार्थ्यांचा सहभाग ५%, महामंडळाचा सहभाग २०%, बँकेचा सहभाग ७५%. महामंडळाच्या कर्ज रक्कमेवर व्याजाचा दर ६% असतो.

 

या योजनांसाठी लागणारी सर्वसाधारण कागदपत्रे : पासपोर्ट साईज 2 फोटो, तहसिलदार/नायब तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा मूळ दाखला (ग्रामीण व शहरी भागासाठी कुटुबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 1.00 लक्ष), सक्षम अधिकाऱ्यांने दिलेले जातीचे प्रमाणपत्र (इ.मा.व.), दरपत्रक (कोटेशन), प्रकल्प अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र व शिधापत्रिकेची झेरॉक्स, सिबिल क्रेडीट रिपोर्ट- थेट कर्म योजनेकरीता (स्कोर किमान ५०० असावा), स्थानिक स्वराज्य संस्थेचे (ग्रामपंचायत/नगरपालिका) व्यवसाय करण्याचाबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, डोमिमाईल किंवा रहिवासी दाखला, आधारकार्ड लिंक केलेल्या पासबुकची झेरॉक्स, वयाच्या पुराव्यासाठी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा दाखला, भाडेकरार किंवा संबंधित जागा मालकाचे संमतीपत्र व व्यवसायाच्या जागेचा असेसमेंट उतारा इ. कागदपत्रे लागतात.

 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना : या योजनांकरीता महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट देवून ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल.

 

3. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष पर्यंत) : सदर योजना संपूर्णपणे संगणकीकृत आहे. या योजनेमध्ये बँकेने रु. 10.00 लाखापर्यंतच्या मर्यादित कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्का (12 टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. सदर योजनेचा कालावधी 5 वर्ष असेल. सदर योजनेसाठी अर्जदाराचे वय 18 ते 50 असावे. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 8.00 लक्ष पर्यंत (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार), कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराचे आधार संलग्न बँक खाते असणे अनिवार्य. महामंडळाच्या www.msobcfdc.org (व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतूपत्र (Letter of Intent) दिले जाईल. अर्जदारास या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे लागेल.

गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.10.00 लक्ष ते 50.00 लक्ष पर्यंत) :- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहीत केलेल्या बार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत), LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थाना बँकेमार्फत स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.8.00 लक्ष पर्यंत असलेल्या उमेदवारांच्या गटास बँकेकडून रु.10.00 लक्ष त

रु.50.00 लाख पर्यंत मंजूर उद्योग उभारणीकरीता कर्ज उपलब्ध केले जाईल. गटातील सदस्यांचे वय 18 ते 45 पर्यंत असावे. गटातील सर्व सदस्यांचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा.

 

परत फेडीचा कालावधी : मंजूर कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल तो कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर (जास्तीत जास्त 12 टक्के व्याज दराच्या आणि रु.15.00 लाखाच्या मर्यादेत) त्यातील व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जगा करण्यात येईल. महामंडळाच्या www.msobcfdc.org (व्याज परतावा योजना पर्याय) या बेवपोर्टल‌द्वारे गटाचा ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतुपत्र (Letter of Intent) दिले जाईल. गटास या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे लागेल.

 

5. महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना:- महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (मा.वि.म.) लोकसंचलित साधन केंद्र (CMRC) यामाध्यमातून ही योजना राबविण्यात येते.

 

योजनेचा उद्देश व स्वरूप : इतर मागास प्रवर्गातील गरीब, होतकरू, परितक्त्या महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे. राज्यातील महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन, प्रक्रिया, मूल्य आधारित उद्योगांकरीता बँकांमार्फत मंजूर करण्यात आलेल्या रु.5.00 ते 10.00 लक्षपर्यतच्या कर्ज रक्केमवरील 12% व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा उपलब्ध करून देण्यात येईल. इतर मागास प्रवर्गातील किमान 50% महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटास प्रथम टप्यात रु.5.00 लक्ष पर्यत कर्ज बँकेकडून उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येईल.

 

बँकेकडून मंजूर केलेल्या कर्ज रक्कमेवरील कमाल 12% व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा ओबीसी महामंडळामार्फत अदा करण्यात येईल.

 

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे : 1.अर्जदारास सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेला इ.मा.व. जातीचा दाखला (OBC). 2. वयाचा पुरावा उदा. जन्म तारखेचा पुरावा/ शाळा सोडल्याचा दाखला. 3. रहिवासी दाखला (आधार कार्ड, लाईट बिल, व्होटर कार्ड इ.). 4.बचत गटाचे बँक पासबुक. 5.बचत गटातील महिला सदस्यांचे CMRC कडून प्रमाणित कौटुंबिक उत्पन्नाबाबतचे प्रमाणपत्र अथवा स्वयं-घोषणापत्र.

 

लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती – 1. अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षे असावे. 2. महिला बचत गटातील महिला इतर मागास प्रवर्गातील व महाराष्ट्राची रहिवासी असावी. 3. प्रथम टप्यातील कर्ज नियमित परतफेडीनंतर सदर बचत गट ‌द्वितीय टप्यात रू.10.00 लक्ष पर्यत कर्ज बँकेकडून मंजूर करून घेण्यास पात्र होईल.

 

कार्यपद्धती – सदर योजना पूर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर नोंद करणे आवश्यक आहे.

 

इच्छुक, गरजू इतर मागास वर्ग (ओ.बी.

,.बी.सी.) प्रवर्गातील व्यक्तिंनी योजनांच्या अधिक माहितीसाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कळवा, ठाणे. २ रा मजला, दत्तवाडी स्वामी समर्थ मठासमोर, सह्याद्री शाळेच्या बाजुला खारेगांव, कळवा, ठाणे- ४००६०५ Email-dmobcthane@gmail.com येथे संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन श्री. नार्वेकर यांनी केले आहे.

 

०००००00000

संबंधित पोस्ट

नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 उमेदवारांना आता ऑफलाईन पध्दतीनेही नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार- रविवार दि.16 नोव्हेंबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगाकडून आढावा..

ब्राह्मण समाजाच्या आंदोलनास मराठा योद्धा जरांगे यांनी दिली भेट माजी मंत्री टोपे, आ. राजेश टोपे यांच्यासह विविध मान्यवरांनी दिल्या भेटी

vishwatmaklokswamivarta

औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथील लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका महिलाचे वाचवले प्राण.

vishwatmaklokswamivarta

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन

रानभाजी महोत्सवाचे 15 ऑगस्ट रोजी आयोजन*