vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जलजीवन मिशन अंतर्गत योजनेतील कामांचे सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावे-पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

जलजीवन मिशन अंतर्गत योजनेतील कामांचे सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावे-पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

 

 

            मुंबई, प्रतिनिधी : जलजीवन मिशन अंतर्गत कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी योजनेतील कामांचे सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

 

जल जीवन मिशनबाबत आढावा बैठक मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, विभागाचे सहसचिव अमन मित्तल, मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अतिरिक्त प्रकल्प संचालक सुषमा सातपुते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अजय सिंग आदी उपस्थित होते.

 

पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची होणारी कामे नागरिकांसाठी महत्त्वाची असून यामुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होणार आहे. विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी कालमर्यादा लक्षात घेऊन कामे करावीत. योजनेतील ज्या कामांमध्ये तांत्रिक कारणास्तव व निविदा प्रक्रिये दरम्यान मूळ अंदाजपत्रकापेक्षा वाढ होऊन पंधरा टक्के जास्त फरक होत आहे. अशा कामांसाठी सुधारित मान्यता गरजेची असून यादृष्टीने परिपूर्ण प्रस्ताव वित्त विभागास सादर करावेत, अशा सूचना मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या.

 

या बैठकीत प्रधान सचिव श्री.दराडे, कार्यकारी संचालक श्री. कृष्णा, श्री. मित्तल, श्रीमती पलांडे यांनी माहिती सादर केली. यावेळी सुधारित मान्यतेसाठी वित्त विभागास सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावावरील अनुषंगाने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली व कार्यवाही बाबत सूचना देण्यात आल्या.

 

०००००

 

किरण वाघ/विसंअ

संबंधित पोस्ट

महिला सक्षमीकरण विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन,इंडो-अमेरिकन चेंबरचे कार्य प्रशंसनीय- राज्यपाल रमेश बैस

vishwatmaklokswamivarta

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात मोठी फूट; या फेडरेशनची माघार, आजपासून कामावर रुजू होणार

अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित हुक्क्याचा ३१ कोटी रुपये किमतीचा साठा जप्त मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती

कोल्हापूरमधील येथील आमदार पी. एन. पाटील यांच्या जाण्याने एक सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आरपीआय हीच आमची माय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**देशभरातील दलितांच्या राजकीय चळवळीचे आरपीआय हेच मातृस्थान* 

vishwatmaklokswamivarta