vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बेस्ट ब्युटीशियन पुरस्कार वितरण साहळा उत्साहात; 23 रक्तदात्यांनी केलं रक्तदान

बेस्ट ब्युटीशियन पुरस्कार वितरण साहळा उत्साहात; 23 रक्तदात्यांनी केलं रक्तदान

 

जालना (प्रतिनिधी) दशरथरावजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात रविवार दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता बेस्ट ब्युटीशियन पुरस्कार वितरण सोहळा आणि रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले. यावेळी 200 विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आलं.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण कार्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक अतिष ससाणे, सरपंच सुभाष दिघे, बहुजन समाज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पी.बी. खरात, डॉ. पल्लवी राठोड यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. पल्लवी राठोड यांच्या हस्ते प्रतिभा अतुल कासारे, स्मिता अनिल साळवे, ज्याती सिध्दार्थ येडे, पुजा सिध्देश्वर काकडे, वैशाली गणेशराव औताडे यांना बेस्ट ब्युटीशियन पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात 200 विद्यार्थ्यांना स्कुल बॅग आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

दरम्यान दशरथरावजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दशरथराव जयराम सुरडकर यांच्या 23 व्या स्मृतीदिनानिमित्त 23 जनांणी रक्तदान करुन सामाजिक कर्तव्य पार पाडले. यावेळी शैलेश खैरे, संतोष हिवराळे, अरुण टाकसाळ, सतिष जगधने, बंडू पळसकर, शहाणे यांनी सहकार्य केलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. दिलीप गीरी यांनी केले तर आभार शैलेश खैरे यांनी मानले.

संबंधित पोस्ट

नवीन अभ्यासिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण होईल – मंत्री मंगल प्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटनविभागामार्फतविविध कार्यक्रमाचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

पारधी समाजाच्या लाभार्थ्यांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य; 10 मार्चपर्यंत अर्जाची मुदत..

vishwatmaklokswamivarta

लायन्स क्लब जालना च्या वतीने आज प्रसादीचे वाटप

vishwatmaklokswamivarta

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानसार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी अर्थसहाय्य; प्रस्ताव मागविले

vishwatmaklokswamivarta

परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटांबना झाल्याबद्दल जाहिर निषेध..

vishwatmaklokswamivarta