vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण व सत्कार समारंभ

राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण व सत्कार समारंभ

 

ठाणे, प्रतिनिधी- राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती/ संस्था / गट/ अधिकारी/ कर्मचारी यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, कृषीभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.

 

राज्य शासनामार्फत सन २०२०, २०२१ व २०२२ या वर्षाच्या वरीलप्रमाणे नमूद केलेल्या एकूण ४४८ पुरस्कार्थीचा सत्कार व पुरस्कार वितरण कार्यक्रम राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते रविवार दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (डोम ), वरळी, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

 

http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या कृषी विभागाच्या युट्यूब चॅनेलवरुन तसेच https://www.facebook.com/AgricultureDepartmentGoM या फेसबुक पेजवरून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. सर्वांनी याच्या थेट प्रक्षेपित कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. सहभागासाठी वरील लिंकवर क्लिक करावे किंवा खालील QR कोड स्कॅन करण्यात यावा, असे महाराष्ट्र राज्य, पुणे कृषी आयुक्तालय, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विनयकुमार आवटे यांनी कळविले आहे.

 

0000000000

संबंधित पोस्ट

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीच्या पावन मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आयोजित केलेल्या ‘स्वराज्य सप्ताह’ या उपक्रमाची मोठ्या थाटामाटात सुरुवात.

vishwatmaklokswamivarta

रस्ता दुभाजक तोडणाऱ्यांवर पोलीस;परिवहन आणिसाबांविने संयुक्त कारवाई करावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

समाजाच्यावरच्या अन्याय, अत्याचाराला गाडण्यासाठी पुन्हा ऐक्याची हाक  

नव्या मुंबईत विधानसभा निवडणूक स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबईत 1.75 लाखाहून अधिक नागरिक, विदयार्थी यांनी घेतली सामुहिक मतदार शपथ  

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल राखून ठेवलेल्या व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा