vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्याला केंद्र सरकारकडून 11,255 कोटींचे कर हस्तांतरण,भांडवली खर्च आणि कल्याणकारी उपक्रमांना मिळणार चालनासणासुदीच्या काळात भांडवल खर्चासाठी एक अग्रिम हप्त्याची रक्कम हस्तांतरित..

राज्याला केंद्र सरकारकडून 11,255 कोटींचे कर हस्तांतरण,भांडवली खर्च आणि कल्याणकारी उपक्रमांना मिळणार चालनासणासुदीच्या काळात भांडवल खर्चासाठी एक अग्रिम हप्त्याची रक्कम हस्तांतरित..

 

 

            नवी दिल्ली, प्रतिनिधी: महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 11,255 कोटी रुपये कर हस्तांतरण आज जारी करण्यात आले. या निधीच्या रक्कमेत आगामी सणासुदीच्या काळात भांडवल खर्च भागविण्यासाठी एका अग्रिम हप्त्याच्या रक्‍कमेचाही समावेश आहे. उर्वरित निधी रक्कम ही राज्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्यासाठी आहे.

 

केंद्र सरकारने सर्व राज्यांना 1,78,173 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ऑक्टोबर, 2024 मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त 89,086.50 कोटी रुपयांच्या एका अग्रीम हप्त्याचा समावेश आहे.या हस्तांतरणाचा उद्देश आगामी सणासुदीच्या काळात राज्यांना भांडवली खर्चात मदत करणे आणि त्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्याचा आहे.

 

महाराष्ट्राला या हस्तांतरणातून 11,255 कोटी रुपये मिळाले आहेत. हा निधी राज्याच्या महत्त्वाच्या योजना आणि उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर सहाय्यभूत ठरणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांनाही मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आला आहे, ज्यामध्ये उत्तर प्रदेशाला सर्वाधिक 31,962 कोटी रुपये, बिहारला 17,921 कोटी रुपये आणि पश्चिम बंगाल राज्याला 13,404 कोटी रुपये मिळाले आहेत.

हे आर्थिक हस्तांतरण राज्यांच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल, ज्यामुळे भांडवल खर्च आणि लोककल्याणाच्या दृष्टीने राज्यांच्या विकासाला गती मिळेल.

संबंधित पोस्ट

महाआवास अभियान राज्यस्तरीय कार्यशाळा शुभारंभ व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न,राज्यपुरस्कृत योजनेत कोकण विभागाने पटकाविला प्रथम क्रमांक,कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्वीकारला पुरस्कार

vishwatmaklokswamivarta

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) आणि पोलिस दलाचे प्रमुखपद पुन्हा बहाल…

vishwatmaklokswamivarta

उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. आम्ही शिवसेनेत आहोत.परंतु समविचारी म्हणून भाजपसोबत जात आहोत, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर

vishwatmaklokswamivarta

लोकाभिमुख सामाजिक संस्थाचा आधारस्तंभ हरपला लोकमान्य टिळक यांचे पणतू, केसरीचे विश्वस्त डॉ. दीपक टिळक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजलीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण केली

माझी मुलगी श्रद्धा हिची अत्यंत क्रूरपणे हत्या करणारा,आफताबला फाशी द्या; श्रद्धाचे वडील विकास वालकरांची मागणी

vishwatmaklokswamivarta

मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सतराव्या आदिवासी युवा देवाणघेवाण उपक्रमाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्याची उपस्थिती 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीत तरुण आदिवासी नेते महत्त्वाची भूमिका बजावतील: डॉ. मनसुख मांडवीय

vishwatmaklokswamivarta