vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेशव्यवसाय

पोलादपूर, महाड व माणगाव तालुक्यातील माजी सैनिक, विधवा,अवलंबित डिफेन्स पेंशन धारकांसाठी भेट दौऱ्याचे आयोजन

पोलादपूर, महाड व माणगाव तालुक्यातील माजी सैनिक, विधवा,अवलंबित डिफेन्स पेंशन धारकांसाठी भेट दौऱ्याचे आयोजन

 

रायगड प्रतिनिधी:- पोलादपूर, महाड व माणगाव तालुक्यातील जे माजी सैनिक, विधवा, अवलंबित डिफेन्स पेंशन धारक आहेत ज्यांची पेंशन स्पर्श पोर्टल मध्ये स्थलांतर झाली नाही, अशा माजी सैनिक,विधवा,अवलंबितांसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग कार्यालयाचे प्रतिनीधी पुढील दिवशी तालुक्याना भेटी देणार असून भेट दौऱ्याचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे.

माणगाव तालुक्याकरिता सोमवार, दि.०२ डिसेंबर २०२४ रोजी भेट देणार असून माणगाव तहसिलदार कार्यालय व माजी सैनिक संघटना कार्यालय, माणगाव हे दौऱ्याचे ठिकाण आहे.पोलादपूर तालुक्याकरिता मंगळवार, दि.०३ डिसेंबर २०२४ ते गुरुवार, दि.०५ डिसेंबर २०२४ रोजी भेट देणार असून पोलादपूर कचेरी कार्यालय हे दौऱ्याचे ठिकाण आहे.

महाड तालुक्याकरिता शुक्रवार, दि.०६ डिसेंबर व शनिवार, दि. ०७ डिसेंबर २०२४ रोजी भेट देणार असून सैनिकी विश्रामगृह महाड नवेनगर दौऱ्याचे ठिकाण आहे.

  याकरिता माजी सैनिक, विधवा, अवलंबित डिफेन्स पेंशन धारकांना भेटी दौऱ्यावेळी मूळ ओळखपत्र व त्याची छायांकीत प्रत, मूळ पीपीओ व त्याची छायांकीत प्रत, डिस्चार्ज बूक व छायांकीत प्रत, आधारकार्ड व पॅन कार्ड छायांकीत प्रत, बँक पासबूक व छायांकीत प्रत, मोबाईल नंबर ही आवश्यक लागणारी कागदपत्रे सोबत आणावीत.

जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा, अवलंबित जे डिफेन्स पेंशन धारक आहेत आणि ज्यांची पेंशन स्पर्श पोर्टलमध्ये स्थलांतर झाली नाही अशा माजी सैनिक,विधवा, अवलंबितांनी कार्यालयीन दिवशी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत भेट देवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल वैजनाथ माने,(नि.) यांनी केले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

डिसेंबर दरम्यान सिकलसेल आजार जनजागृती सप्ताह-नागरिकांनी सिकलसेलची रक्त तपासणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वर्सोवा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

पंढरपूरचे सलग 7 वेळा निवडून आलेले माजी खासदार संदिपान थोरात कालवश

अंतर्गत तक्रार निवारण समितीची स्थापना करून माहितीऑनलाइन करण्याचे महिला व बालविकास विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कोरोनाचा धोका वाढला, सातारा जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती…

नागरी समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार :- विद्याधर महाले पाटील,बाबासाहेबांमुळे मी सचिव व आमदार होऊ शकलो सिद्धार्थ खरात

vishwatmaklokswamivarta