प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझाद मैदानात पाच डिसेंबर ला महायुतीचा शपथविधी सोहळा…!
राज्य प्रतिनिधी-मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमतानंतर महायुती सरकारचां शपथविधी अखेर ठरला आहे. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानामध्ये हा शपथविधी होणार आहे. महायुती सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान यावेळी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपांचे आमदारांनाही मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यात महायुतीचं सरकार बहुमताने सत्तेत आलं तरी मुख्यमंत्रिपदाचं आणि शपथविधीचं काही ठरत नव्हते. या आधी शपथविधीच्या तारखा आणि ठिकाणांवर अनेकदा चर्चा झाल्या. पण आता शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता हा शपथविधी होणार आहे. या कार्यक्रमाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.