जिल्हाधिकारी श्री.किशन जावळे यांच्या हस्ते पनवेलमध्ये ‘क्षयरोग दुरीकरण मोहिमेचे उद्घाटन रायगड जिल्ह्यात आजपासून ‘क्षयरोग दुरीकरण मोहिमेस’ सुरूवात..
रायगड प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2025 पर्यंत टीबी मुक्त भारत करण्याचे स्वप्न आहे. क्षय रोग निर्मूलन साठो 100 दिवसांचा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पपनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. येथून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर येजा होत असते. त्यामुळे येथील हॉट स्पॉट शोधून आपल्याला सातत्याने काम करावे लागणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री.किशन जावळे यांनी केले आहे.
केंद्रीय क्षयरोग विभागाच्या सूचनेनुसार संपूर्ण भारतात आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार संपुर्ण रायगड जिल्ह्यात आज ७ डिसेंबर पासून पुढील १०० दिवसांच्या कालावधीत ‘क्षयरोग दुरीकरण मोहिम: १०० दिवस’ राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन एमजीएम रूग्णालय पनवेल येथे जिल्हधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी ते बोलत होते.
यावेळी पनवेल महानगरपालिका आयुक्त श्री. मंगेश चितळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, एमजीएमचे वैद्यकिय संचालक सुधीर कदम, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, जिल्हा क्षयरोग अधिकारी सचिन जाधव, पनवेल महानगरपालिका उपायुक्त डॉ.वैभव विधाते, पनवेल महानगरपालिका मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एस.दळवी, एमजीएम विद्यापीठाचे शाखाप्रमुख डॉ.जी.एस नरशेट्टी, तहसिलदार विजय तळेकर, आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले, पनवेल महानगरपालिका ज्या पध्दतीने आरोग्य क्षेत्रात काम करते ते वाखण्णया सारखे असून अभिनंदनास पात्र आहे. आरोगयाच्या बाबतीत पनवेल स्वयंपूर्ण होण्याकरिता त्यांना संपूर्ण सहकार्य दिले जाईल. याबरोबरच या मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यातील आदिवासी, कातकारी, कोळी बांधव, विट्टभट्ट्या अशा सर्व भागांतील सर्वेक्षण केले जाईल.
आयुक्त श्री. मंगेश चितळे म्हणाले पनवेल महानगरपालिकेच्यावतीने नागरी क्षेत्रात आरोग्य सेवेची शंभर टक्के काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. यासाठी जिल्हाधिकारी जावळे यांचे व एमजीएम रूग्णालयाचे नेहमीच पालिकेला सहकार्य मिळत असते. याचबरोबर येत्या काळात महापालिकेचे 450 खाटांचे माताबाल संगोपन रूग्णालय तयार होणार यासाठी देखील सीएसआर फंडातून विविध कंपन्याचे सहकार्य आम्हाला मिळेल याची शाश्वती असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते टी बी रुग्णांना सकस व पोषक आहार देण्यात आला