vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन..

 

राज्य प्रतिनिधी-

सनातन धर्म हा केवळ धर्मच नाही; तर ती जीवन पद्धती आहे. सनातन धर्माने प्रत्येक धर्माचा स्वीकार व आदर केला आहे. सहिष्णुता व सर्वसमावेशकता ही सनातन धर्माची बलस्थाने आहेत. त्यामुळे मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राज्यपाल राधाकृष्णन यांनी मुंबईतील महाराणी अहिल्यादेवी होळकर मैदान गोरेगाव येथे सुरु असलेल्या ४ – दिवसांच्या हिंदू आध्यात्मिक आणि सेवा मेळाव्याला गुरुवारी (दि. ९) संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते.

मेळाव्याचे आयोजन हिंदू आध्यात्मिक व सेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

भारतातील लोक स्वभावतःच धर्मनिरपेक्ष आहेत. दयाभाव येथील संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळेच कोरोना महामारीच्या काळात भारताने कोविड लस स्वतःपुरती न वापरता जगातील गरीब देशांना देखील विनामूल्य उपलब्ध करून दिली, असे राज्यपालांनी सांगितले. त्यामुळे मानवतेच्या सेवेसाठी भारताला बलशाली होणे आवश्यक आहे, असे राज्यपाल म्हणाले.

यावेळी राज्यपालांनी मेळाव्यात आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. हे  प्रदर्शन दि. ९ ते १२ जानेवारी पर्यंत सुरु राहणार असून या भारताच्या समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणे हा या मेळाव्याचा उद्देश आहे, असे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाला हिंदू आध्यात्मिक आणि सेवा फाउंडेशनचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत सिंह कोठारी, शारदा रामप्रकाश बुबना,सीए के सी जैन, गिरीश भाई शहा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज कल्याण पूर्व येथे #शिवसेना विजय निर्धार सभा मोठ्या उत्साहात आणि कल्याणकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादात संपन्न

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित ; राज्याचे दरडोई उत्पन्न ३.४७ लाखांवर’ ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2025-26’ सादर • देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा• देशातील थेट परकीय गुंतवणुकीत ३१ टक्के वाट्यासह राज्य अग्रस्थानी• स्टार्टअप्सच्या संख्येतही राज्याचा देशात सर्वाधिक १७ टक्के ,नवीकरणीय ऊर्जेची क्षमता वाढत असून राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर• ६३.८५ लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी त्यातून २.५२ कोटींहून अधिक रोजगार निर्माण*

अल्पसंख्याक समाजाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाअल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठीयोजना, उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करा- अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

दृष्यमान शाश्वत स्वच्छतेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील”कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू मोहीम आज 1 मे पासून

नंदुरबारमध्ये अयोग्य दर्जाचे खाद्यतेल प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येणार-मंत्री नरहरी झिरवाळ

पुना येथील आधी पर्वती, नंतर सारसबाग, आता शनिवारवाड्यात नमाजपठण…सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी…

vishwatmaklokswamivarta