vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भारतपर्व महोत्सवात महाराष्ट्राचा ‘मधाचे गाव’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ

भारतपर्व महोत्सवात महाराष्ट्राचा ‘मधाचे गाव’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ..

 

नवी दिल्ली प्रतिनिधी-: लाल किल्ला परिसरात भारत पर्व महोत्सवाचे आयोजन प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार असून या महोत्सवास महाराष्ट्र राज्याचा ‘मधाचे गाव’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ असणार आहे.

दरवर्षी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने लाल किल्ला येथे भारतपर्व महोत्सवाचे आयोजन प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त केले जाते. यावर्षी या महोत्सवात महाराष्ट्राचा चित्ररथ दर्शविण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह बारा राज्यातील चित्ररथ ही इथे असणार आहेत. दिनांक 26 ते 29 जानेवारी दरम्यान भारतपर्व महोत्सव चालेल.

हे वर्ष संविधानाचे अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे केले जात असून, यावर्षी चित्ररथांसाठी ‘सुवर्ण भारत : वारसा आणि विकास’ ही मध्यवर्ती संकल्पना आहे. या संकल्पनेच्या आधारावर महाराष्ट्र राज्याने ‘मधाचे गाव’ असा चित्ररथ तयार केला.

मधमाशांचे पर्यावरणाच्या आणि मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे.मधाचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेऊन, स्थानिक रोजगार निर्मिती आणि उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने 2022 मध्ये ‘मधाचे गाव’ ही योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश स्थानिक रोजगार निर्मिती करणे आणि गावे आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे. त्याचबरोबर पर्यटन व पर्यावरण यासाठीही ही योजना महत्त्वाची आहे.

संबंधित पोस्ट

राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपतीसंभाजीनगरःपर्यटन’, कॉफीटेबल बुकचे पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते विमोचन

वाळवा तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी जागेचा सर्वे करावा-उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले निर्देश

हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम”शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाची तयारी सुरू 21 डिसेंबर रोजी होणार खारघर येथे भव्य कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जेजुरी येथे वारकऱ्यांना हायजिनिक किटचे वाटप

मिशन भरारी’ अंतर्गत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यां चे इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत होणार प्रयाण