vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रशासनिक न्यायाधिकरणाची लोकअदालत;१७ प्रकरणात तडजोड

प्रशासनिक न्यायाधिकरणाची लोकअदालत;१७ प्रकरणात तडजोड

छत्रपती संभाजीनगर, द प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रशासनिक न्यायाधिकरण, खंडपीठ औरंगाबाद येथे आज लोक अदालत संपन्न झाली. या विशेष लोक अदालतचे आयोजन महाराष्ट्र प्रशासनिक न्यायाधिकरण, खंडपीठ औरंगाबाद, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि उच्च न्यायालय विधी सेवा उप समिती औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. एकूण १७ प्रकरणात तडजोड करुन समेट करण्यात आला.

लोक अदालत कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रशासनिक न्यायाधिकरण खंडपीठ औरंगाबादचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती डी. के. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशासकीय सदस्य विवेक कारंजाकर, न्यायिक सदस्य ए. एन. कस्बेकर, तसेच कायदा सल्लागार टी. डी. देशमुख, मुख्य सचिवालय अधिकारी महेश सावंत आणि प्रमुख साक्षात्कार अधिकारी रेश्मा देशमुख उपस्थित होते.न्यायाधिकरणामध्ये प्रलंबित असलेल्या अनेक प्रकरणांमध्ये लोक अदालतच्या माध्यमातून तडजोडी करण्यात आल्या. यात एकूण १७ प्रकरणांचे तडजोडीच्या माध्यमातून समाधान करण्यात आले. यामध्ये अर्जदार अ‍ॅड. करीम सय्यद आणि सरकारी साक्षात्कार अधिकारी रेश्मा देशमुख यांनी विशेष भूमिका बजावली. लोक अदालतच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र प्रशासनिक न्यायाधिकरण खंडपीठ औरंगाबादचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच न्यायिक व प्रशासकीय सदस्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

संबंधित पोस्ट

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध विभागात एकूण २ लाख ४० हजार ५४९ मतदार

vishwatmaklokswamivarta

इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध

अमृत आणि एम.सी.ई.डी.मार्फत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

निवडणूक कामकाजविषयक आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतली नोडल अधिका-यांची आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्गमधील अरुणा प्रकल्पांतर्गत मौजे हेत जल सिंचन प्रकल्पास २ हजार २५ कोटी…

अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर-पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निधीचे वितरण 

vishwatmaklokswamivarta