vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

कोकण विभागातील भूमि अभिलेख विभागाची “100 मुख्यमंत्री कृति आराखडा” अंतर्गत आदर्श कामगिरी भूमापन ते डिजिटल नकाशांपर्यंत सर्वांगीण यश…

कोकण विभागातील भूमि अभिलेख विभागाची “100 मुख्यमंत्री कृति आराखडा” अंतर्गत आदर्श कामगिरी भूमापन ते डिजिटल नकाशांपर्यंत सर्वांगीण यश…

राज्य माहिती प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या “100 मुख्यमंत्री कृति आराखडा” या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत कोकण विभागातील भूमि अभिलेख विभागाने भू-व्यवस्थापनाच्या विविध घटकांमध्ये भरीव कार्य करत एक आदर्श निर्माण केला आहे. भूप्रणाम केंद्रे, स्वामित्व योजना, ई-अभिलेख अंतर्गत बल्क साईन प्रकल्प, डिजिटाईज नकाशे आणि आकारबंद प्रकरणांवर विभागाने केलेल्या कामांची दखल राज्य पातळीवर घेतली जात आहे.

1.डिजिटल मोजणी आणि ‘क’ प्रत ऑनलाईन-भूमि अभिलेख विभागाने जमिनीच्या मोजणी प्रक्रियेत सुधारणा करत ‘ई-मोजणी 2.1’ प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना 100 दिवसात विभागात ७८४८ (८३.१३%) मोजणी नकाशे अक्षांश-रेखांशासह क प्रत ऑनलाईन स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देणेत आल्या आहेत, ज्यामुळे मोजणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता वाढणार आहे

भूमी अभिलेख विभागाचे नवीन पोर्टल https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाचे पोर्टल अद्ययावत केले असून, यामध्ये 17 विविध सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधांमध्ये 7/12 उतारा, 8अ उतारा, फेरफार नोंदणी, ई-नकाशा, ई-मोजणी अभिलेख, जमीन महसूल भरणा, ई-पिक पाहणी इत्यादींचा समावेश आहे .

 भूप्रणाम केंद्र (Land Records Centers):• नागरिकांना भू-सेवांसाठी एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विभागात 8 तालुक्यात भूप्रणाम केंद्रांची स्थापना करण्यात आली.

7/12 उतारा, फेरफार, मोजणी अहवाल, नकाशे, आकारबंदी आदेश यांसारख्या सेवांसाठी वन-स्टॉप सोल्यूशन.

• अनेक तालुक्यांमध्ये नवीन भूप्रणाम केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून, नागरिकांची कार्यालयीन पायपीट लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. स्वामित्व योजना -केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली ड्रोनच्या साहाय्याने गावठाण क्षेत्राचे मोजमाप व मालकी प्रमाणपत्र वाटप यशस्वीपणे पूर्ण.

गावठाणातील रहिवाशांना प्रथमच अधिकृत मालकीचा दस्त मिळाल्याने बँक कर्ज, विक्री व्यवहार यास चालना मिळाली.

कोकण विभागात १८८४२ सनदा /प्रमाणपत्र गावांमध्ये वाटप यशस्वीरित्या वाटप करण्यात आले बल्क साईन प्रणाली:

• भूमी अभिलेख विभागाने ४७९४१८८ जुने अभिलेख दस्तांची ई-अभिलेख अंतर्गत ऑटोमेटेड डिजिटल स्वाक्षरी (bulk sign) प्रणालीद्वारे स्वाक्षरी केली असून कार्यप्रवाह गतीमान.

• अधिकारी वर्गाची श्रमबचत आणि दस्तांची प्रमाणिकता सुनिश्चित.डिजिटाईज नकाशे (Digitized Cadastral Maps):

• विभागाने सर्व तालुक्यातील सर्व नकाश्यांचे स्कॅनिंग पूर्ण करून डिजिटायझेशन ते GIS आधारित प्रणालीत समाविष्ट करणेचे काम प्रगतीत आहे• नागरिकांना त्यांच्या जमिनीचे नकाशे ऑनलाइन मिळवणे शक्य झाले असून, फेरमोजणी आणि सीमाभांडे प्रकरणांमध्ये अचूकता.

• समुद्र किनारी असलेली महसूली गाव नकाशाची अंतिम सीमा रेषा ते समुद्राच्या उच्चतम भरती रेषा या दरम्यान जमिनी काम -राज्यातील किनाऱ्यालगत महसुली गावांच्या अंतीम हद्दी व त्या हद्दीपासून समुद्राच्या / खाडीच्या उच्चतम भरती रेषा यामधील तयार झालेल्या जमिनी परंतु अद्याप सर्वेक्षण होऊन मोजणी अंती महसूल दप्तर तयार न झालेल्या अशा जमिनींचे सर्वेक्षण, मोजणी व वापराच्या धोरणाबाबतचे काम प्रगतीत आहे .

संबंधित पोस्ट

Jio Cheapest Plan | जीओचा सर्वात स्वस्त प्लॅन; Netflix, Hotstar, Amazonचे मोफत सबस्क्रिप्शन

Super Admin

राज्यात ५ जी तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगाने वाढविण्याकरिता भारतीय टेलेग्राफ नियमांप्रमाणे राज्याचे दूरसंचार धोरण सुसंगत असे करण्यात आले आहे.  यासंदर्भातील निर्णय .. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  

vishwatmaklokswamivarta

Sony ने सादर केला धमाकेदार Camera; चालत्या ट्रेनमधून काढा HD फोटो

Super Admin

Electric Scooter ला आग लागल्याची भारतात पहिलीच घटना, पाहा व्हिडिओ

Super Admin

स्क्रिन साफ करण्यासाठी Appleने लाँच केला खास कपडा; किंमत पाहाच!

Super Admin

लाभार्थ्यांनी पी एम किसान योजनेच्या लाभासाठी 23 जूनच्या कॅम्प मध्ये    — कृषी सहसंचालक श्री.अंकुश माने