vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्या

मुंबई, वडाळा रेल्वे मोनोरेल खाली ब्रिज जवळ तीन अल्पवयीन मुले सापडली. परिवाराचा शोध मुंबई पोलीस.

वडाळा मोनो रेल खाली रडत बसणाऱ्या अल्पवयीन तीन मुलांच्या परिवाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा,

दिनांक १३/०७/२०२१ रोजी 19.00 वा. चे सुमारास वडाळा रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोनोरेल ब्रिज खाली तीन लहान अल्पवयीन मले १) मुलगा नामे रियाजु राजकुमार वय ०३ वर्ष ,२) मुलगी खुशी ०७ वर्ष, ३) मुलगी नामे खुशबू वय ०५ वर्ष असे वडाळा मोनोरेल ब्रिज खाली रडत असताना इसम नामे मोहम्मद नमिद अन्सार शेख यांना दिसले असता त्यांनी त्या मुलांना वडाळा पोलिस स्टेशन येथे घेऊन गेले असता तेथील पोलिसांनी सदरची मुले ही र. अ. की. मार्ग. पोलीस स्टेशन हद्दीत मिळून आल्याने पोलिस स्टेशन ला आणून दिली .तेव्हा नमूद मुलांच्या पालकांचा पोलिस स्टेशन हद्दीत शोध घेतला असता ते मिळून आले नाही तसेच चॅनल वर सर्व पोलिस स्टेशन यांना सदर मुलांचे पालक मिळून आल्यास र.अ. की. मार्ग.पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्यास सांगण्यात आले आहे.

सदर अल्पवयीन मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षितते कामी मानखुर्द बालसुधार गृह येथे जमा करण्यात आले आहे.   वरिष्ठ पोलिस निरीक्षक,र.अ. की. मार्ग.पोलिस स्टेशन, मुंबई.* मुलांची कोणाला माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क करा आणि जनतेने सहकार्य करावे

संबंधित पोस्ट

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात १०५ अंतिम उमेदवार

vishwatmaklokswamivarta

कुणबी प्रमाणपत्र वितरणास प्रारंभ; जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचे वितरण

vishwatmaklokswamivarta

पिक्चर अभी बाकी है’ मनसे नेते अमेय खोपकरांचं ट्वीट

विशेष लेख -:आर्थिकदृष्ट्या “गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य” करण्या आहे दक्ष..आपला ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’

आरक्षण तसेच अन्याय अत्याचाराच्या मुद्यावर खोरिपचे राज्यभर आंदोलन / मा.आ.उपेंद्र शेंडे               

धारणीतील महाविधी शिबिरात शेवटचा घटक आश्वस्त*विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम*36 स्टॉलवर शासकीय विभागांची माहिती….

vishwatmaklokswamivarta