
मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर
मुंबई : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच सर्व शैक्षणिक विभागांतील पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने होणार आहेत. आज १२ ऑगस्ट २०२१ पासून विद्यार्थ्यांना uom-admissions.mu.ac.in या संकेतस्थळावरून पदव्यूत्तर अभ्यासक्रमांना अर्ज सादर करता येतील. विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रणाली तयार केली आहे.
विद्यापीठातील विविध विद्याशाखानिहाय राबविण्यात येणाऱ्या एकूण ४८ पदव्यूत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील १२ अभ्यासक्रम, मानव्यविद्याशाखेतील २८ अभ्यासक्रम, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील २ अभ्यासक्रम आणि आंतरविद्याशाखेतील ६ पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. (Mumbai News)ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकऑनलाईन नोंदणी प्रक्रीया आणि अर्ज सादर करणे – १२ ऑगस्ट ते २६ऑगस्ट, २०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)विभागाने ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी – २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट,२०२१ (स.११.०० वाजे पर्यंत )तात्पूरती (प्रोव्हिजनल ) गुणवत्ता यादी जाहिर करणे – ३० ऑगस्ट, २०२१( सायं. ६.०० वा.) विद्यार्थ्यांची तक्रार असल्यास – ३१ ऑगस्ट, २०२१अंतिम गुणवत्ता यादी – ०२ सप्टेंबर, २०२१ ( सायं. ६.०० वा.)ऑनलाईन शुल्क भरणे– ०३ सप्टेंबर ते ०७ सप्टेंबर, २०२१



