
पुरेशा लससाठ्याअभावी दिनांक १९ आणि २० ऑगस्ट २०२१ रोजी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद*
• *शनिवार दिनांक २१ ऑगस्ट २०२१ रोजी होणार लसीकरण*
कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या, गुरुवार दिनांक १९ ऑगस्ट २०२१ रोजी तसेच शुक्रवार दिनांक २० ऑगस्ट २०२१ रोजी लसीकरण बंद राहणार आहे.
दरम्यान, दिनांक १९ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाला लससाठा प्राप्त होणार आहे. दिनांक २० ऑगस्ट २०२१ रोजी दिवसभरात लस केंद्रांना त्याचे वितरण करण्यात येईल. सबब, शनिवार, दिनांक २१ ऑगस्ट २०२१ रोजी लसीकरण पुन्हा सुरु होईल.
लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
***



