vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यसंस्काराची तयारी; ब्रह्मकुमारी पद्धतीने अंत्यविधी

: सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यसंस्काराची तयारी; ब्रह्मकुमारी पद्धतीने अंत्यविधी

मुंबई प्रतिनिधी : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर कलाविश्वाला आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ह्रदय विकाराच्या झटक्याने अवघ्या 40व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थच्या पार्थिवावर आज ब्रह्मकुमारी पद्धतीने अंत्यविधी होणार आहेत. थोड्याच वेळात मृतदेह रुग्णवाहिकेतून ओशिवरा येथील सिद्धार्थच्या घरी नेण्यात येईल. अंत्यसंस्कारासाठी रुग्णवाहिका फुलांनी सजवली आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर यानंतर आता त्याचे पार्थिव घराच्या दिशेने रवाना करण्यात आलं आहे.

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने ‘बिग बॉस 13’ सिझन आपल्या नावावर केलं. त्यानंतर ‘खतरो के खिलाडी’मध्ये देखील त्याने विजय मिळवला. फक्त रियालिटी शो नाही तर सिद्धार्थने अनेक मालिकांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. ‘बालिका वधू’ मालिकेच्या माध्यमातून तो घरा-घरात पोहोचला आणि प्रेक्षकांच्या मनात त्याने घर केलं.

चाहत्यांच्या मनात राज्य करणाऱ्या सिद्धार्थने अखेर जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. एका मॉडेलच्या रूपात त्याने करियरला सुरूवात केली. त्यानंतर 2004 साली त्याने अभिनयात पदार्पण केलं. 2008 रोजी त्याने ‘बाबुल का आंगन छूटे’ या मालिकेत दिसला. पण सिद्धार्थला लोकप्रियता ‘बालिका वधू’ मालिकेच्या माध्यमातून मिळाली.

संबंधित पोस्ट

मी तुम्हाला लिहून देतो की, गोव्यात भाजपला बहुमत मिळणार नाही. त्यामुळं ते तोडफोड करुन सरकार बनवू शकतात.”

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांसोबत गुवाहाटी दौऱ्यावर, घेणार कामाख्या देवीचं दर्शन

vishwatmaklokswamivarta

१८ डिसेंबरपासून #माळेगाव यात्रेला सुरुवात भव्य कार्यक्रमांचे आयोजन; भाविकांसाठी सर्वांगीण सुविधा मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची माहिती..

vishwatmaklokswamivarta

आरोग्य दूतांचे आवाहन, चला जाऊया मतदानाला निर्विघ्न मतदान प्रक्रियेसाठी आरोग्य विभाग दक्ष

मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत..

vishwatmaklokswamivarta

भारतात सध्या चर्चेत,इस्रायल च्या स्पायवेअर पेगॅसस बनवणारी कंपनी दावा,आमच्यामुळे लाखो लोक सुखाने झोपू शकता,सुरक्षित राहू शकतात.