vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हिमाचल प्रदेशमध्ये खासगी हॉटेलमध्ये वास्तव्य करावं लागणार आहे. चार दिवसांच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हिमाचल प्रदेशमध्ये खासगी हॉटेलमध्ये वास्तव्य करावं लागणार आहे. चार दिवसांच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली प्रतिनिधी  : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हिमाचल प्रदेशमध्ये खासगी हॉटेलमध्ये वास्तव्य करावं लागणार आहे. चार दिवसांच्या दौऱ्यावर येण्याआधी हिमाचल प्रदेशमधील रिट्रिट या राष्ट्रपती निवासस्थानातील चार कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राष्ट्रपतींना राष्ट्रपती निवासाऐवजी शिमल्यातील एका खासगी हॉटेलमध्ये उतरावं लागणार आहे.

चार दिवसांच्या दौऱ्यात राष्ट्रपती हे हिमाचल प्रदेशाच्या विधानसभेच्या विशेष सत्रात सदस्यांना संबोधित करणार आहेत. येथे इतरही अनेक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती रामनात कोविंद हे शिमलामधील छराबडा इथल्या राष्ट्रपती निवासस्थानी राहणार होते. तिथल्या चार कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी शनिवारी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर राष्ट्रपती सेसिल हॉटेलमध्ये राहणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.राज्याच्या विधानसभेला संबोधित करणारे कोविंद हे तिसरे राष्ट्रपती ठरणार आहेत. याआधी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी यांनी राज्याच्या विधानसभेला संबोधित केलं होतं. विद्यमान आमदारांशिवाय माजी मुख्यमंत्री शांता कुमार आणि प्रेम कुमार धुमल यांच्यासह माजी मुख्यमंत्री आणि सर्व माजी आमदारांना विशेष अधिवेशनासाठी निमंत्रण देण्यात आल्याची माहिती हिमाचल प्रदेशमधील अधिकाऱ्यांनी दिली आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे गुरुवारपासून हिमाचल प्रदेशच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते राष्ट्रपतींच्या निवासस्थानाऐवजी एका खासगी हॉटेलमध्ये वास्तव्य करणार आहेत. राष्ट्रपती हिमाचल प्रदेशच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती शुक्रवारी सकाळी ११ ते १२ या कालावधीत विधानसभेला संबोधित करणार आहेत. त्यादिवशी सांयकाळी एखा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतील. १८ सप्टेंबरला ते शिमल्यात भारतीय लेखा परीक्षेच्या निरोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर १९ सप्टेंबरला ते दिल्लीला रवाना होतील.

संबंधित पोस्ट

संत ज्ञानेश्वर उद्यान दि.२६ पर्यंत पर्यटकांसाठी खुले करण्याचे नियोजन करावे- खा.संदिपान भुमरे

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश…

ऑनलाईन जुगारावर बंदीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार ! – गोवा व छत्तीसगड राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !ऑनलाईन जुगारावर नियंत्रणासाठी राष्ट्रव्यापी कायदा करण्याची सुराज्य अभियानाची मागणी..

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग कल्याण विभागातील सर्व रिक्त पदेपुढील तीन महिन्यात भरणार- दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

विधानसभा मतदार संघामध्ये 36 मोबाईल व्हॅनद्वारे EVM/VVPAT मशीन्सद्वारे जनजागृती

vishwatmaklokswamivarta