vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उद्योगांच्या सामाजिक उपक्रमांचे राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• कृषी, आरोग्य, महिला सक्षमीकरण क्षेत्रात गोदरेज इंडस्ट्रीज करणार २५ कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक

उद्योगांच्या सामाजिक उपक्रमांचे राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• कृषी, आरोग्य, महिला सक्षमीकरण क्षेत्रात गोदरेज इंडस्ट्रीज करणार २५ कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, उद्योग क्षेत्राच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांमुळे या प्रयत्नांना बळ मिळत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. गोदरेज इंडस्ट्रीज समूहाच्या ‘गुड अँड ग्रीन’ उपक्रमांतर्गत राज्यात सार्वजनिक आरोग्य, महिला सक्षमीकरण, बांधकाम कामगार कल्याण, कृषी विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुढील तीन वर्षांत २५ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,गोदरेज समूहाचा महाराष्ट्राशी १२० वर्षांहून अधिक काळाचा संबंध असून, राज्यातील विविध सामाजिक विकास उपक्रमांमध्ये समूह योगदान देत आहे.राज्यात मलेरिया निर्मूलन आणि डेंग्यू नियंत्रणासाठी आतापर्यंत १६ हजार गावे आणि ९ हजार झोपडपट्ट्यांमध्ये उपक्रम राबविण्यात आले आहेत. २०३० पर्यंत महाराष्ट्र मलेरियामुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. बांधकाम कामगारांसाठी राबविलेल्या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ९० हजार कामगारांची नोंदणी झाली असून, १८० कोटी रुपयांहून अधिक शासकीय निधीचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.महिला सक्षमीकरण आणि शेतकरी समृद्धीमहिलांना घरमालकीचा हक्क मिळवून देण्यासाठी तसेच पदवीधर महिलांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. पुढील तीन वर्षांत ८०० हून अधिक महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. कृषी क्षेत्रात १०० हून अधिक शेतकरी समूह सक्षम करून ५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडविण्याचे नियोजन आहे. दुग्धव्यवसायातील ७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञान आणि पशुवैद्यकीय सेवांचा लाभ देण्यात येणार आहे.

जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धन,नाशिक आणि बीड जिल्ह्यांत जलसंधारण, मृदसंधारण आणि भूजल पुनर्भरणाचे उपक्रम राबविण्यात आले असून, आतापर्यंत ३ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. नागपूर येथे एकात्मिक कचरा व्यवस्थापन उपक्रमांतर्गत २०२५-२६ मध्ये ३५ हजार ३०२ मेट्रिक टनांहून अधिक कचरा पुनर्वापरासाठी वळविण्यात आला आहे. हरित बांधकाम साहित्य आणि प्लास्टिकला पर्यायी साहित्य विकसित करण्यासाठीही संशोधन व नवकल्पनांना प्रोत्साहन दिले जात आहे.

शासन आणि उद्योग क्षेत्राच्या समन्वयातून सामाजिक विकास, आर्थिक सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणारे हे उपक्रम महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या दिशेने महत्वपूर्ण योगदान देणारे ठरणार आहेत.

0000

संबंधित पोस्ट

भारतीय रेल्वेने तीन विभागांमध्ये 472 किमी मार्गावर ‘कवच 4.0’ सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करून अंमलबजावणीला दिली गती एकाच दिवसात कवच प्रणालीचे आतापर्यंतचे सर्वाधिक कार्यान्वयन साध्य

vishwatmaklokswamivarta

राहुरी मतदारसंघात १७ व १८ एप्रिल रोजी गृह मतदानज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा…

रिपब्लिकन पक्षाचा (खोरिपा) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर ११ मार्च २०२६ रोजी धडक मोर्चा….

शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत गुणात्मक परिवर्तनासाठी सर्वेक्षणाची मदत होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारी रोजी होणार मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरूवात

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी  यांच्या निवासस्थानी कुटील आंदोलन करून देशवासीयांची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस पक्षाला धडा शिकवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ने  दादर येथील टिळक भवन काँग्रेस कार्यालयावर  धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले

vishwatmaklokswamivarta