vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एमपीएससी’च्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या जाहिरातीत सुधारणा सहायक कृषी अधिकारी पदनामात बदल; आता ‘कृषी सेवक, गट-क’ असे पदनाम

एमपीएससी’च्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या जाहिरातीत सुधारणा-सहायक कृषी अधिकारी पदनामात बदल; आता ‘कृषी सेवक, गट-क’ असे पदनाम

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या जाहिरातीसंदर्भात आयोगाने शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या शुद्धिपत्रकानुसार कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिनस्त संवर्गातील सहायक कृषी अधिकारी, गट-क या पदनामात बदल करून त्याऐवजी ‘कृषी सेवक, गट-क’ असे पदनाम करण्यात आले आहे.

आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधून विविध संवर्गांतील रिक्त पदे भरण्यासाठी २५ जून २०२६ रोजी जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीसंदर्भात ६, १३, १७ आणि २० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या शुद्धीपत्रकांच्या अनुषंगाने सदर सुधारणा करण्यात आली आहे.

तसेच, नागपूर विभागांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरावयाच्या एकूण पदांचे आरक्षण व त्याचा प्रवर्गनिहाय तपशील शुद्धिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे. याशिवाय, कृषी पदविका धारण केलेल्या उमेदवारांसाठी शैक्षणिक अर्हतेसंदर्भात महत्वाची स्पष्टता करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी पदविका राज्यातील कृषी विद्यापीठांच्या पदविकेशी समतुल्य असलेल्या पुढील चार अभ्यासक्रमांच्या पदविकांना ग्राह्य समजण्यात येणार आहे.

१. उद्यानविद्या पदविका (फळबागा उत्पादन) २. उद्यानविद्या पदविका (भाजीपाला उत्पादन)३. उद्यानविद्या पदविका (फूल शेती व प्रांगण उद्यान) ४. कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या मूळ जाहिरातीतील तसेच यापूर्वीच्या शुद्धीपत्रकातील इतर अटी व तरतुदींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या शुद्धीपत्रकाची सविस्तर माहिती आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

मुंबई व पुणे विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत बैठक

vishwatmaklokswamivarta

दुष्काळग्रस्त भागात पोषण व आरोग्याच्या काळजीसाठी महिला व बालविकास विभाग सक्रिय – मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

हनुमान जयंतीनिमित्त जागृत दक्षिणमुखी घनतृप्त हनुमान मंदिराच्या बारागाड्या उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पदभरती प्रक्रिया वेगात पूर्ण करावी – जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील बैठकीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती

वीस वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला, नर्मदेतून महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बैठक

कारागृहात रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; बंद्यांना बांधली राखी

vishwatmaklokswamivarta