vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कार्तिकीएकादशी यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार एसटी महामंडळाने सुमारे एक हजार जादा बसेस सज्ज ठेवल्या आहेत -परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक

 कार्तिकीएकादशी यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार एसटी महामंडळाने सुमारे एक हजार जादा बसेस सज्ज ठेवल्या आहेत -परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक

राज्य प्रतिनिधी-

#पंढरपूर येथे संपन्न होणाऱ्या #कार्तिकीएकादशी यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार #एसटी महामंडळाने सुमारे एक हजार जादा बसेस सज्ज ठेवल्या आहेत. या माध्यमातून भाविकांना सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने पंढरपूर येथील चंद्रभागा बसस्थानकातून राज्यातील विविध भागांसाठी जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. दर्शनानंतर भाविकांना आपल्या गावी परतण्यासाठीही पुरेशा बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गर्दीचे नियोजन, बसफेऱ्यांचे व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महामंडळाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा, तर ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तिकिटाच्या दरात ५० टक्के सवलत दिली जाते. या सवलतींचा लाभ घेत भाविकांनी खासगी वाहनांऐवजी एसटीच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवाससेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

‘भक्तीचा प्रवास असो वा परतीची वाट, वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटीची लालपरी सदैव सज्ज आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आनंददायी व्हावा, यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे,’ असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.#ST

संबंधित पोस्ट

अमरावतीत १०० मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी इमारतीची आवश्यकता;१५ दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन 

नवोदय विद्यालयाच्या इयत्ता ९ वी व ११ वी प्रवेश परीक्षेसाठी अर्जाची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

मिशन भरारी’ अंतर्गत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यां चे इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत होणार प्रयाण

ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक शिक्षण पोहोचविण्यास शासन प्रयत्नशील – मंत्री आदिती तटकरे ‘एज्युकेशन ग्रोथ नेटवर्क’च्या दोन दिवसीय उपक्रमाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

माझी मनपा सेल्फी” उपक्रमाने मतदारांना घातली भुरळ-अहिल्यानगर मनपा स्वीप समितीच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण ‘वोट सेल्फी पॉईंट्स’चे प्रदर्शन-हजारो मतदान कर्मचाऱ्यांनी काढले सेल्फी

vishwatmaklokswamivarta

परराज्यातील अवैध मद्य वाहतूक प्रकरणी कारवाई; २ कोटी ३० हजाराचा मुद्देमाल जप्त