vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात 57 टँकरव्दारे 58 गावे, 415 वाड्यातील सव्वा लाख बाधित लोकसंख्येला पाणीपुरवठा

जिल्ह्यात 57 टँकरव्दारे 58 गावे, 415 वाड्यातील सव्वा लाख बाधित लोकसंख्येला पाणीपुरवठा

        सांगली, प्रतिनिधी) : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सांगलीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणासाठी टँकर व विहीर अधिग्रहणाद्वारे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. बाधित गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे तसेच स्थानिक पातळीवर खाजगी विहिरी व बोअरचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेच्या 2 नोव्हेंबर अखेरच्या अहवालानुसार 50 खाजगी व 7 शासकीय अशा एकूण 57 टँकरव्दारे 58 गावे व 415 वाड्यातील 1 लाख 21 हजार 636 बाधित लोकसंख्येला व 11 हजार 346 पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 31 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित केल्या आहेत

  जत तालुक्यातील टंचाईग्रस्त 49 गावे व 346 वाड्यांमधील सुमारे 1 लाख 4 हजार, 256 लोकसंख्येला 48 टँकरद्वारे (42 खाजगी व 6 शासकीय) पाणी पुरवले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात 20 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या असून 2 डिझेल इंजिन भाड्याने घेण्यात आले आहेत.

    कवठेमहांकाळ तालुक्यातील टंचाईग्रस्त 1 गाव व 8 वाड्यांमधील 1834 लोकसंख्येसाठी 1 शासकीय टँकर सुरू आहे. नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्यामुळे गावात पाणीटंचाई भासू नये यासाठी 2 खाजगी विहिरी/बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

        तासगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त 1 गाव व 6 वाड्यांमधील ८५५ लोकसंख्येला १ खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. तालुक्यात ३ खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.       आटपाडी तालुक्यातील टंचाईग्रस्त 7 गावे व 55 वाड्यांमधील 14691 नागरिकांना आणि 11346 पशुधनाला 7 खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. या तालुक्यात 3 विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत

        खानापूर तालुक्यात 2 गावे टंचाईग्रस्त असून 3 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर-बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा घेतला आढावा; शेतकऱ्यांना दिली मदतीची हमी..जिल्ह्यातील कोलारी, खडकी खामखेड, रोहिणखेड, टाकळी येथे केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकाऱ्यांची गॅस एजन्सीला भेट; ग्राहकांशी संवाद गॅस वितरणाचा दैनंदिन आढावा, अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे; महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकरांचे आभार बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६

vishwatmaklokswamivarta

परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात-दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

२५ वर्षांची प्रतीक्षा संपली हाजुरीतील १९ कुटुंबांना हक्काच्या घरांच्या चाव्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित