vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ताकई यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खोपोली परिसरात २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान जड-अवजड वाहनांना वाहतूक बंदी

ताकई यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खोपोली परिसरात २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान जड-अवजड वाहनांना वाहतूक बंदी

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताकई (साजगाव), ता. खालापूर येथील विठ्ठल रखुमाई मंदिर यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी खोपोली-पेण आणि खोपोली-पाली मार्गांवरील काही मार्गांवर जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी दिनांक २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२६ या कालावधीत दररोज दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

ताकई येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात दरवर्षी पंधरा दिवस यात्रा भरत असून दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. यात्रेमध्ये महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. मंदिर परिसर खोपोली-पेण मार्गालगत असल्याने औद्योगिक मालाची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी व अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली आहेखोपोली-पाली रोडवर पाली बाजूकडून साजगाव मार्गे खोपोलीकडे येणारी जड-अवजड वाहतूक (पाली फाटा/इसांबा फाटा). खोपोली-पेण रोडवर पेण बाजूकडून इसांबा फाटा मार्गे खोपोलीकडे येणारी जड-अवजड वाहतूक.खोपोलीकडून पाली व पेण रोडला जाणारी जड-अवजड वाहतूक, शिळफाटा ते इसांबा दरम्यान.

पाली व पेण बाजूकडून येणाऱ्या वाहनांसाठी :१. पाली फाटा – इसांबा फाटा – सावरोली – सावरोली चारफाटा – खालापूर फाटा.२. पाली फाटा – इंडियाबुल्स एक्सप्रेस वे अंडरपास – सावरोली चारफाटा – खालापूर फाटा.

खोपोली शिळफाटा येथून पाली व पेणकडे जाणाऱ्या वाहनांसाठी :१. शिळफाटा – खालापूर फाटा – सावरोली चारफाटा – एक्सप्रेस वे अंडरपास – पेण/पाली मार्गे.दुध, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला, पाणी आदी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना या वाहतूक बंदीतून वगळण्यात आले आहे.यात्रा कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी बंदीच्या वेळेत पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

संविधान जागृती प्रश्नमंजुषा’ उपक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण

विकसित भारत जी राम जी अंतर्गत जिल्ह्यात एकूण 28,368 कामांना मान्यता- दुष्काळ प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत नियोजन- 25,75,401 मजूर-दिवस रोजगार उपलब्ध होणार- जलतारा, जलपुनर्भरण, सिंचन सुविधा, चारा लागवडीच्या कामांवर भर- दुष्काळ जाहीर झालेल्या चार तालुक्यांत 13,422 कामे

नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली नवी मुंबई क्षेत्राची पावसाळी पाहणी 

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करावी-आरोग्य योजनांच्या निधीच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयांचे सक्षमीकरण व्हावे- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

महाराष्ट्र राज्य सर्व राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर   जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  निदर्शने