vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दि.07 डिसेंबर रोजी अलिबाग येथे डाक अदालतीचे आयोजन

दि.07 डिसेंबर रोजी अलिबाग येथे डाक अदालतीचे आयोजन

रायगड-अलिबाग ( प्रतिनिधी- अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग यांच्या कार्यालयामार्फत दि.07 डिसेंबर 2026 रोजी, दुपारी ठीक दुपारी 03.00 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

रायगड विभागातील डाक सेवेसंबंधित ज्या तक्रारी/समस्या 6 आठवड्यांच्या कालावधीत निकाली काढण्यात आलेल्या नाहीत, अशा टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर इत्यादी सेवांशी संबंधित तक्रारींचा डाक अदालतीमध्ये विचार करण्यात येईल.

तक्रारीमध्ये सविस्तर माहिती जसे की तक्रारीचा दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल कैली त्या अधिकाऱ्याचे नाव व हु‌द्दा इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. इच्छुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतींमध्ये, अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग यांच्याकडे दि.04 डिसेंबर2026 पर्यंत पोहोचेल अशा रीतीने पाठवावी.

तसेच प्रादेशिक डाक अदालत (Regional Dak Adalat) दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी, पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई क्षेत्र पनवेल यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात येते. त्यानुसार डिसेंबर 2026 महिन्याची प्रादेशिक डाक अदालत दि.04 डिसेंबर 2026 रोजी सकाळी 11.00,वाजता आयोजित करण्यात आली आहे. या डाक अदालतीमध्ये तक्रार मांडू इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपले अर्ज दि. 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत संबंधित कार्यालयाकडे सादर करावेत

००००

संबंधित पोस्ट

राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांना‘आपले सरकार सेवा केंद्रा’चा दर्जा!- मंत्री ॲड.आशिष शेलार यांची माहितीग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय आणि डिजिटल सेवा गावातच उपलब्ध होणार

vishwatmaklokswamivarta

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील-जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा घेतला आढावा 

तृतीयपंथीयांसाठी बीजभांडवल योजना;३० मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनस्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध

प्री, पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सहकार संकुलनाचे पालक मंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन  

ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ च्या माध्यमातून महाराष्ट्र डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’इंडिया रायझिंग’ आणि ‘जिओ ब्लास्ट’मुळे भारतीय युवा गेमर्ससाठी जागतिक व्यासपीठ खुले..

vishwatmaklokswamivarta