vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबईत १ व २ डिसेंबर रोजी ‘कॅनडा-भारत फ्यूचर स्किल्स समिट २०२६’चे आयोजन*

नवी मुंबईत १ व २ डिसेंबर रोजी ‘कॅनडा-भारत फ्यूचर स्किल्स समिट २०२६’चे आयोजन*

ठाणे, प्रतिनिधी):महाराष्ट्रातील युवकांना आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि भविष्यातील औद्योगिक रोजगार संधींसाठी सज्ज करण्यासाठी ‘कॅनडा-भारत फ्यूचर स्किल्स समिट २०२६’ ही आंतरराष्ट्रीय परिषद १ व २ डिसेंबर २०२६ रोजी वाशी, नवी मुंबई येथील सिडको ऑडिटोरियम अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे. ‘Future of Manufacturing in India 2026 – Talent, Technology, Transformation’ या संकल्पनेवर आधारित ही परिषद ITM स्किल्स युनिव्हर्सिटी आणि कॅनडातील हंबर पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच ग्लोबल अफेयर्स कॅनडा अंतर्गत ‘कॅनडा फंड फॉर लोकल इनिशिएटिव्हज’ (CFLI) च्या सहकार्याने आयोजित केली जात आहे. रोबोटिक्स, ऑटोमेशन, एआय (AI), स्मार्ट फॅक्टरी आणि आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानातील बदलांसाठी आवश्यक कौशल्ये युवकांमध्ये रुजविणे तसेच भारत-कॅनडा शैक्षणिक व औद्योगिक सहकार्य दृढ करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.

 मंगळवार, १ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ITM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष डॉ. पी. व्ही. रमणा यांनी निमंत्रण दिले आहे. या परिषदेस कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि वरिष्ठ अधिकारी मनीषा वर्मा (भा.प्र.से) उपस्थित राहणार आहेत. तसेच भारतातील कॅनडाचे उच्चायुक्त ख्रिस्तोफर कूटर, मुंबईतील कॉन्सुल जनरल जेफ डेव्हिड यांच्यासह कॅनडाचे राजनैतिक व व्यापार प्रतिनिधी, हंबर ग्लोबलच्या डीन डॉ. डायन सिम्पसन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ, ITM चे प्रा. डॉ. आर. एस. एस. मणी व नितीन पुत्वा, विविध उद्योग संस्थांचे प्रतिनिधी, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत

 परिषदेच्या पहिल्या दिवशी (१ डिसेंबर) स्मार्ट फॅक्टरी, रोबोटिक्स, ऑटोमेशन, इंडस्ट्री ४.० ते ५.०, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, महिला नेतृत्व यांवरील चर्चासत्रे तसेच उत्पादन तंत्रज्ञान व एआयवरील संशोधन निबंध सादरीकरण होणार आहे.

   दुसऱ्या दिवशी (२ डिसेंबर) ‘School Innovation Challenge’ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कार्यरत IoT प्रकल्पांचे प्रदर्शन आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

     अधिक माहिती व नोंदणीसाठी www.itm.edu/lp/humber-cfli या संकेतस्थळावर तसेच समन्वयासाठी श्री. सिद्धू हिरेमठ (९०२२९४५९३७, sidhu@itm.edu) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000000

संबंधित पोस्ट

अमरावतीच्या वडरपुरा येथील वस्तीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कष्टकरी महिलांसमवेत साजरी केली दिवाळी भाऊबीज-वनजमिनीचे पट्टे महसूल विभागामार्फत कष्टकऱ्यांना मोफत देण्याचा केला निर्धार!

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूरच्या महापौर श्रीमती रूपाराणी निकम यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर दालनात आज  सदिच्छा भेट घेतली.

मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन नियोजन करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• धरण प्रकल्पांसह सांडपाणी पुनर्वापर, पाणीगळती नियंत्रण आणि पर्यायी स्रोतांवर भर द्या मुख्यमंत्र्यांनी घेतला महानगर क्षेत्रांतील पाणी नियोजनाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी दुहेरी सुविधा नवे एस्केलेटर आणि मोफत शौचालयाचे गुरुवारी लोकार्पण खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश ..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी लोहारी सावंगा येथे शेतकऱ्यांनी संवाद व मुक्काम; शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट दूर करण्याचा विश्वास

vishwatmaklokswamivarta