vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि तहसिलदार उमेश पाटील यांची ठाणे रिंग मेट्रो कार शेडच्या जागेवरील अतिक्रमणांवर धडक कारवाई* *वडवलीतील ८ वाणिज्य बांधकामे हटवण्यास सुरुवात*

*प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि तहसिलदार उमेश पाटील यांची ठाणे रिंग मेट्रो कार शेडच्या जागेवरील अतिक्रमणांवर धडक कारवाई* *वडवलीतील ८ वाणिज्य बांधकामे हटवण्यास सुरुवात*

 

ठाणे,दि.२७(जिमाका): महत्त्वाकांक्षी ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने पावले उचलली असून, कार शेडच्या नियोजित जागेतील अतिक्रमणांविरोधात अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या निर्देशानुसार आज धडक मोहीम हाती घेण्यात आली.

मौजे वडवली (कासारवडवली परिसर) येथील सर्व्हे क्रमांक १४२ मधील जागेवर उभारण्यात आलेली एकूण ८ वाणिज्य स्वरूपाची अनधिकृत अतिक्रमणे प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि तहसिलदार उमेश पाटील यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून ही सर्व अतिक्रमणे तातडीने हटविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

प्रकल्पाच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ही जागा अतिक्रमणमुक्त करणे आवश्यक होते. त्यानुसार, आज २७ नोव्हेंबर रोजी सकाळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने मौजे वडवली येथील स.नं. १४२ या ठिकाणी जाऊन अतिक्रमण धारकांना याबाबत कल्पना देत निष्कासनाच्या कामाला सुरुवात केली.

वाणिज्य वापरासाठी उभारण्यात आलेली ही आठही बांधकामे जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, यामुळे रिंग मेट्रो कार शेडच्या पुढील कामाचा मार्ग मोकळा होणार आहे.

00000000

संबंधित पोस्ट

भूकंपविषयक आपत्ती व्यवस्थापनाची १७ फेब्रुवारी रोजी रंगीत तालीम; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन• राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक राहणार उपस्थित

vishwatmaklokswamivarta

शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी रस्ता सुधारणा कामासाठी 30 जुलैपर्यंत वाहतुकीस बंद

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागविले

दिव्यांगांना कृत्रिम पायांचे वाटप; पुनर्वसन केंद्राचा टप्प्याटप्प्याने विस्तार होणार  – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

बुलढाणा १९ एप्रिल रोजी भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा