vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त विठ्ठल मंदिर कसबा येथे आज रोजी जयंती साजरी करण्यात आली यावेळी राजेश राऊत बाबासाहेब वानखेडे कैलास गोरंट्याल गोकुळ स्वामी माणिकमोठे चंद्रकांत रत्नपारखे वंचितास भगुरे रजनीकांत बंडालू ओम कायंदे गणेश बेनिवाल कैलास रसाळ शिवलाल वडोदे …बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण करण्यात येईल – राजेश राऊत

बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त विठ्ठल मंदिर कसबा येथे आज रोजी जयंती साजरी करण्यात आली यावेळी राजेश राऊत बाबासाहेब वानखेडे कैलास गोरंट्याल गोकुळ स्वामी माणिकमोठे चंद्रकांत रत्नपारखे वंचितास भगुरे रजनीकांत बंडालू ओम कायंदे गणेश बेनिवाल कैलास रसाळ शिवलाल वडोदे …बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण करण्यात येईल – राजेश राऊत

जालना ( प्रतिनिधी) बिरसा मुंडा यांची 151 वी जयंती विठ्ठल मंदिर विठ्ठल मंदिर कसबा येथे साजरी करण्यात आली, अध्यक्ष स्थानावरून बोलताना राजेश राऊत उपमहापौर जालना महानगरपालिका यांनी असे सांगितले की बिरसा मुंडा यांच्या विचाराने देशात क्रांती होऊ शकते, त्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजाने संघटित होण्याची काळाची गरज आहे, लवकरच जालना शहरातील एका नामांकित चौकाला बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात येऊन त्या ठिकाणी बिरसा मुंडा यांचा भव्य असा पुतळा उभा करण्यात येईल , सदरील कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी समाज विकास मंच यांच्या वतीने घेण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. विजय कुमठेकर म्हणाले की, ब्रिटिश काळापासून ते आजपर्यंत आदिवासी समाज हा संघटित कधी होऊ शकला नाही, देशपातळीवर हा समाज फार मोठ्या प्रमाणात असून या समाजामध्ये शिक्षण येणे ही काळाची गरज आहे. केवळ कायदे करून हा समाज संघटित होणार नाही तर या समाजाला संघटित करण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. शिक्षणामुळे माणसांना पदवी मिळते पदवी प्राप्त केलेल्या माणसाने समाज बदलविण्यासाठी आणि समाजाला एकत्र करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, ब्रिटिश काळामध्ये कोणाची साथ नसताना बिरसा मुंडा यांनी उलगुलान केले होते, आज विकासाच्या नावाखाली या देशातील संपूर्ण आदिवासींना बेघर करण्यासाठी, षड्यंत्र सुरू आहेत. विकास हा केवळ दीन,दलित, शोषित, आदिवासी यांच्यावरच अवलंबून असतो का? देशाच्या सर्वोच्च पदावर एक आदिवासी महिला बसलेली असताना सुद्धा तिचा अवमान कशा पद्धतीने केला जातो हे आजही आपण पाहतो, संसदेच्या भूमिपूजन प्रसंगी उद्घाटन प्रसंगी तिला बोलावले जात नाही, राम मंदिरासारख्या ठिकाणी केवळ आदिवासी आहे म्हणून तिला बोलावले जात नाही पण गंमत अशी आहे मित्रांनो, नाशिक येथील कुंभमेळ्यात तिला बोलावून संपूर्ण आदिवासी समाजाला एकत्र केले जाते. अशा कार्यक्रमातून आदिवासी संस्कृती संपवण्याचे षडयंत्र देशात सुरू आहेत, आदिवासींच्या नावाने फायदे घेण्यापेक्षा देशातील विकासाचे महत्वाचे धागे झाले पाहिजेत, मा .आ. कैलास शेठ गोरंट्याल, म्हणाले की मी सातत्याने आदिवासी समाजाच्या सोबत राहणार आहे , त्यांनी आवाज द्यावा कधीही वेळप्रसंगी मदत करण्यास तयार आहे,शिवलाल अक्षय यांचीही मनोगत झाले, बाबासाहेब वानखेडे , शिवप्रकाश चितळकर, यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. माणिक तोटे, चंद्रकांत रत्नपारखे, गंगाराम आढाव, अंगद कापरे, किशोर स्वामी, बन्सीदास भगुरे, रजनीकांत बंडालू, ओम कायंदे, गणेश बेनीवाल कैलास रसाळ

 शिवलाल वडोदे, संतोष लामकाने, गयाबाई साळवे, रेखा षडमल्लू, शिवकन्या षडमल्लू, करुणा साळवे, प्रगती षडमल्लू, प्रशंशा षडमल्लू , शैलेश लिंबेकर, इत्यादीसह अनेक कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता, यावेळी कार्यक्रमासाठी आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक , आभार प्रदर्शन गोकुळ स्वामी यांनी केले.

 

 

संबंधित पोस्ट

हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्ष**24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

खामगावचा गुरुवारचा आठवडी बाजार पुढे ढकलला

vishwatmaklokswamivarta

कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्रात पुढील आठवडाभर पावसाचा जोर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ प्रभावी आणि व्यापक स्वरूपात राबविण्यात यावे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महापौर कार्यालय-लोकमान्य सावरकरनगर प्रभागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात – महापौर शर्मिला पिंपळोलकर