vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना;शासनाकडून प्रोत्साहनपर निधी वितरित- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना;शासनाकडून प्रोत्साहनपर निधी वितरित- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, प्रतिनिधी- राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२५ अंतर्गत विविध घटकांना प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे

या निर्णयानुसार राज्यातील प्रमुख शहरी वाहतूक उपक्रमांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. बेस्ट (मुंबई), नागपूर महानगरपालिका (NMT), पुणे महानगरपालिका (PMPL), कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका (NMMT) आणि ठाणे महानगरपालिका (TMT) या सहा उपक्रमांना मिळून ₹४.५५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. यामुळे शहरांमध्ये सार्वजनिक ई-वाहतूक अधिक सक्षम होणार आहे. ई-वाहनांच्या मागणीला चालना देण्यासाठी उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्यात आले आहे. यात बजाज ऑटो लि., महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. आणि Euler मोटर्स प्रा. लि. यांना तीन चाकी वाहनांसाठी एकूण ₹२.५१ कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे.

याशिवाय, अथर एनर्जी प्रा.लि., टीव्हीएस मोटर कंपनी, चेतक टेक्नॉलॉजी आणि इतर कंपन्यांना ई-दुचाकी व ई-तीनचाकी वाहनांसाठी एकूण ₹४.४५ कोटींपेक्षा अधिक प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात येणार आहे.

तसेच सन. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी २४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे राज्यातील ई-वाहन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

राज्यातील सर्व शाळा मॉडेल स्कूल करण्याचा प्रयत्न– शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ‘चला शाळेत जाऊया’ उपक्रमांतर्गत शाळांना भेटी; विद्यार्थ्यांशी संवाद

vishwatmaklokswamivarta

तत्वनिष्ठ, व्यासंगी इतिहास संशोधक हरपला,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली

अरुणाचल प्रदेशात उद्यापासून भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

शासकीय मुलामुलींचे वसतिगृह येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी रेणुका राठोड यांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत जवळ जवळ 150 मूल व मुली यांना वाहन चालवण्याचा परवाना,

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने मुंबईच्या ऐतिहासिक वारसा संवर्धनाला चालना मिळणार वैभव संगोपन योजनेंतर्गत शिवडी किल्ला आरपीजी फाउंडेशनकडे संगोपनासाठी; वरळी किल्ल्याच्या संवर्धनासाठीही प्रयत्न· बाणगंगा, वरळी कोळीवाडा आणि शिवडी किल्ल्यात वारसा जतनासोबत महिला सक्षमीकरणावर भर

vishwatmaklokswamivarta

राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याचा पाणी पुरवठा निश्चित करावा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील