vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुंबई–गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावर अपघात; जखमी प्रवाशांची पालकमंत्र्यांकडून जिल्हा रुग्णालयात जावून विचारपूस

मुंबई–गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावर अपघात; जखमी प्रवाशांची पालकमंत्र्यांकडून जिल्हा रुग्णालयात जावून विचारपूस..

रत्नागिरी, प्रतिनिधी मुंबई–गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील अंजणारी पुलावर आज पहाटे ट्रक आणि खासगी बसची धडक झाली. या दुर्घटनेत बसमधील प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जावून सर्व जखमी प्रवाशांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली..

यावेळी डॉक्टरांकडून जखमींच्या सद्यस्थितीची आणि सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेण्यात आली. “जखमींना वेळेत आणि योग्य उपचार मिळावेत, तसेच त्यांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत आणि सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात,” अशा स्पष्ट सूचना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.

याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्यासह रुग्णालय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री रोजगार निमिर्ती कार्यक्रमात जिल्ह्याची भरारी1 हजाराहून अधिक प्रकरणांना मंजुरी*राज्याच्या अग्रगण्य जिल्ह्यात स्थान

🇮🇳 देशात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध — अफवांवर विश्वास ठेवू नका!

मानसिक आरोग्य आढावा मंडळावर अशासकीय सदस्यांना अर्ज करण्याचे आवाहनअर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत अंतिम मुदत  मंडळात लातूर, नांदेड, बीड,धाराशिव जिल्ह्याचा समावेश

उष्णतेच्या लाटेबाबत जिल्हा प्रशासनाचा इशारा

नेपाळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये प्रशासन सतर्क!

महिला दिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विद्यार्थिनींचे औक्षण करून स्त्रीशक्तीचा अनोखा सन्मान- ‘नारीशक्ती संवाद’ कार्यक्रमातील भावनिक क्षण