vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे दालन उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे दालन उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

मुंबई, प्रतिनिधी : मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे दालन उभारण्यासाठी शासन पुढाकार घेईल. सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून हे दालन उभारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित आणि ग्रंथाली प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, ग्रंथाली प्रकाशनचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, संपादक प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, व्यंगचित्रकला ही एक अशी प्रभावी कला आहे, जिथे एकही शब्द न उच्चारता हवे तेवढे प्रभावी फटके मारता येतात आणि नेमके सांगायचे ते लोकांपर्यंत पोहोचवता येते. कोणत्याही काळातील घडामोडी असोत किंवा विरोधाभास असो, तो सातत्याने व्यंगचित्रांच्या माध्यमातून मांडण्याचे काम मराठी व्यंगचित्रकारांनी केले आहे.व्यंगचित्रांच्या माध्यमातून संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते. ही एक विलक्षण कला आहे. जी महाराष्ट्राच्या मातीने आधीपासून जोपासली आहे. ही कला भावी पिढीपर्यंत नेण्यासाठी हे पुस्तक निश्चितच मोलाची भूमिका बजावणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित केले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनोगतात व्यंगचित्रकलेच्या शैलीतील ‘रीडिंग इन बिटवीन लाईन्स’ म्हणजेच रेषांमधला अर्थ समजावून सांगत व्यंगचित्रकार म्हणून काम करताना आलेले अनुभव, ‘फटकारे’ या पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास तसेच व्यंगचित्रकार हा नेहमीच समाजातील विसंगतीवर चोख बोट ठेवतो, याचे महत्त्व स्पष्ट केले. शासन पुढाकार घेऊन व्यंगचित्रकारांच्या कलेचे दालन उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढताना रेषांचे महत्त्व, स्वाभिमान आणि अचूक टिपण असावे, असे सांगत जुन्या काळातील व्यंगचित्रविश्वातील आठवणींना उजाळा दिला. संस्कृती आणि कलेच्या व्यासपीठावर एकत्र येणे ही महाराष्ट्राची जुनी परंपरा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या ग्रंथाच्या निर्मितीमागील प्रचंड परिश्रमांचे कौतुक केले. व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी आणि ‘ग्रंथाली’च्या सदस्यांनी घेतलेली मेहनत आणि गोळा केलेली ऐतिहासिक व्यंगचित्रे ही महाराष्ट्राच्या भावी पिढीसाठी एक अमूल्य ठेवा ठरणार असल्याचे सांगितले. तसेच, ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या कार्याचा गौरव करत पुणे विद्यापीठात त्यांच्या नावाचे अध्ययन केंद्राचे काम सुरू केले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला व्यंगचित्रकार, कलाप्रेमी नागरिक उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या माध्यमातून दिव्यांगांना सेवा देऊन आत्मनिर्भर करणार – मुख्य सचिव राजेश अग्रवाल ‘दिव्यांग व्यक्तींच्या समावेशन व सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) क्षमता उलगडणे’ या विषयावर प्री-समिट राऊंडटेबलचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यातील प्राचीन हस्तलिखितांचे होणार दस्तऐवजीकरण

बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात पुणे जिल्ह्याने खेळाला दिले प्राधान्य; स्पर्धेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद – उपमुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

⛈️ रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा

अतिधोकादायक सी 1 प्रवर्गातील इमारतींचा पाहणी दौरा नळजोडणी व मलनि:सारण वाहिनी खंडित..

भूमिहीन दलित-आदिवासींना कास्तपट्टे व ७/१२ मिळण्यासाठी२८ सप्टेंबरला जनआक्रोश आंदोलन- दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. मगरे यांची माहिती

vishwatmaklokswamivarta