vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात! सिमेंट मिक्सरच्या धडकेत स्कूटीस्वार सुनील सिंह यांचा जागीच मृत्यू; चालक राजू कुमार पासवान याला अटक

मुंबईतील सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात! सिमेंट मिक्सरच्या धडकेत स्कूटीस्वार सुनील सिंह यांचा जागीच मृत्यू; चालक राजू कुमार पासवान याला अटक

मुंबई प्रतिनिधी : रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास सायन-पनवेल महामार्गावर देवनार बस डेपोसमोर भीषण रस्ते अपघात घडला. सिमेंट मिक्सर ट्रकने स्कूटीवरून प्रवास करणाऱ्या सुनील निद्धू सिंह (वय ५०) यांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत सुनील सिंह यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंट मिक्सरची धडक बसल्यानंतर सुनील सिंह हे रस्त्यावर कोसळले. त्यानंतर ट्रकचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की त्यांना वाचविण्याची संधीही मिळाली नाही.

मृत सुनील निद्धू सिंह (५०) हे मुंबईतील माटुंगा पूर्व येथील साई विश्वा इमारतीत वास्तव्यास होते. त्यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील रानीपूर, राजमो येथे आहे.या अपघातानंतर ट्रॉम्बे पोलिसांनी तातडीने कारवाई करत सिमेंट मिक्सर चालक राजू कुमार पासवान (वय ३८) याला अटक केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) वंजारे साहेब करीत आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे मृत सुनील सिंह यांच्या कुटुंबीयांवर आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

संबंधित पोस्ट

जनगणनेसाठी आवश्यक घरांचे गट व सीमांकन करण्याचे काम वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया 

संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितलताई प्रदीपभाऊ खोमणे ह्या जिल्हा परिषद सर्कल खंडाळी येथून विजयी झाल्याबद्दल मा. श्री. भास्कर आबा दानवे, नगरसेवक तथा भाजपा विधानसभा प्रमुख, जालना यांच्या हस्ते सत्कार

ठाण्यात पुन्हा रंगणार गरब्याचा महासोहळा ! ‘रास-रंग ठाणे २०२६’ची जय्यत तयारी  ११ ऑक्टोबरपासून दहा रात्री ठाणेकर थिरकणार  नैतिक नागदा, एन २ बँडसह नामवंत गायकांची पर्वणी, विशेष मुलांसाठी व ठाणे मनपा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र गरबा…

vishwatmaklokswamivarta

पुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी समिती बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिरात नमुंमपा समाजविकास विभागाच्या योजनांचेही माहिती प्रसारण

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग ४० किमी रस्ता दोन दिवसांत दुरुस्तीचे नियोजन; MIDC पट्ट्यातील १४ किमी रस्त्याची चार दिवसांत दुरुस्ती