vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’

मुंबई, प्रतिनिधी: कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र नव्हते ते होते स्वप्नांचे प्रतिबिंब. प्रत्येक रेषेत जिद्द, प्रत्येक रंगात आशा आणि प्रत्येक कलाकृतीत स्वतःला सिद्ध करण्याची ताकद दडलेली होती. निमित्त होते सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग कलाकारांसाठीच्या विशेष कला कार्यशाळेचे.

मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन येथे ६ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान दिव्यांग कलाकारांसाठीच्या विशेष कला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन यांच्या सहकार्याने व आयसोवा (IASOWA) आणि राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग सक्षमीकरण संस्था (NIEPID) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत मुंबई आणि परिसरातील विविध संस्थांमधील ४२ दिव्यांग कलाकारांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेत, आपल्या सर्जनशीलतेची झलक सादर केली आहे. या कार्यशाळेत १८ पेक्षा अधिक संस्थां सहभागी झाल्या. या उपक्रमामागे आयसोवाच्या अध्यक्ष मीनाक्षी अग्रवाल यांचा महत्त्वपूर्ण पुढाकार आहे.

कलेच्या माध्यमातून वेगळी ओळख,या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे विविधतेतून निर्माण होणारी सर्जनशीलता. ऑटिझम, डाउन सिंड्रोम, बौद्धिक दिव्यांगत्व, श्रवणदोष, अल्पदृष्टी, पॅराप्लेजिया अशा विविध प्रकारच्या दिव्यांगत्वावर मात करत या कलाकारांनी कलेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. कलाकारांनी सूक्ष्म तपशीलांनी परिपूर्ण चित्रे रेखाटली. प्रत्येकाच्या कलेत त्यांचा स्वतःचा अनोखा दृष्टिकोन दिसून येत होता. त्यांच्या प्रत्येक रेषेत एक प्रयत्न, प्रत्येक रंगात एक जिद्द आणि प्रत्येक चित्रात मीही काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास दिसत होता.

दिव्यांग कलाकारांसाठी कलाही एक वेगळीच ओळख निर्माण करते. त्यांच्या आयुष्यातील आव्हाने, संघर्ष आणि अनुभव हे त्यांच्या कलेतून अधिक प्रभावीपणे व्यक्त होतात. जिथे शब्द अपुरे पडतात, तिथे रंग त्यांच्या भावना स्पष्टपणे मांडतात. कधीकधी एक साधे चित्रही त्यांच्या मनातील खोल विचार आणि भावना व्यक्त करून जाते. शारीरिक किंवा बौद्धिक अडचणी असूनही ही मुल कलेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत.

योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि व्यासपीठ मिळाल्यास या मुलांची कला अधिक खुलते. शाळा, संस्था आणि शिक्षक यांची भूमिका इथे अत्यंत महत्त्वाची ठरते. लहान वयातच त्यांच्या कलेला दिशा दिल्यास ते केवळ चांगले कलाकारच नव्हे, तर आत्मविश्वासू व्यक्ती म्हणून घडतात. दिव्यांग मुलांच्या कलेला प्रोत्साहन देणे ही केवळ कुटुंबाची किंवा संस्थांची जबाबदारी नाही, तर संपूर्ण समाजाची आहे. त्यांच्या कलाकृतींना दाद देणे, प्रदर्शनांना भेट देणे आणि त्यांना संधी उपलब्ध करून देणे हीच खरी त्यांच्यासाठी प्रेरणा ठरते.

या कार्यशाळेचा उद्देश सर्जनशील चित्रकला सत्रे, कौशल्य विकास उपक्रम, आत्मविश्वास वाढविण्याच्या संधी आणि कला क्षेत्रातील करिअर मार्गांची ओळख करून देणे हा आहे.

या कार्यशाळेचा समारोप ८ एप्रिल रोजी होणाऱ्या चित्रप्रदर्शनाने होणार आहे. दुपारी ३ वाजता जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या मुख्य सभागृहात या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, ८ ते १० एप्रिल २०२६ दरम्यान हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

दिव्यांग कलाकारांनी आपल्या कलेतून सिद्ध केले आहे की,मर्यादा शरीरात असतात, पण स्वप्नांना आणि सर्जनशीलतेला कधीच मर्यादा नसतात. दिव्यांग कलाकारांसाठी आयोजित हा ‘विविधतेचा उत्सव’ केवळ एक कला उपक्रम नसून, तो आहे त्यांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या कलेचा उत्सव.

0000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात ३० जूनपर्यंत जलतरण तलाव बंद

मुंबईतील नागरिक कामे पावसाळापूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. पावसाळापूर्व तयारी प्रभावीपणे करून त्यावर अंमलबजावणी करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले. 

बॉलीवूड चित्रपटातील थरारक दृश्यासारखा अपघात! भरधाव काळ्या रंगाची BMW कार कोस्टल रोडच्या पार्किंग लॉट मध्ये कोसळली तिघांचा मृत्यू एक जखमी

vishwatmaklokswamivarta

हक्काच्या अधिकृत घरांच्या चाव्या मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – हणमंत जगदाळे,क्लस्टर, डीपी रोड आणि रिंग मेट्रो प्रकल्पाला गती देण्याचा ठामपा सभागृह नेते हणमंत जगदाळे यांचा निर्धार,लोकमान्यनगर-शास्त्रीनगरवासियांचा निर्धार मेळावा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

46 वे विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शन 14 व 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर मध्ये….

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा निवडणूक 2025-2026 करिता मतदान अधिका-यांच्या प्रशिक्षणास नेरुळ विभागापासून प्रारंभ-प्रशिक्षणास गैरहजर कर्मचा-यांवर कायदेशीर कारवाई