vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची अवैध हातभट्टी दारुचे वाहतुकीवर धडक कारवाई5 लाख 22 हजार 200 रुपयांचा मुददेमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची अवैध हातभट्टी दारुचे वाहतुकीवर धडक कारवाई5 लाख 22 हजार 200 रुपयांचा मुददेमाल जप्त

सातारा प्रतिनिधी : निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सातारा यांनी 19 ऑक्टोबर रोजी निरा लोणंद मार्गावर पाडेगाव या गावच्या हद्दीत हजरत पठाणशहा बाबादर्गा समोर सापळा रचून अवैध हातभट्टी दारुचे वाहतुकीवर कारवाई करून आरोपीच्या ताब्यातून रु. 5 लाख 22 हजार 200 किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांनी दिली.

करण्यात आलेल्या कारवाईत 35 लिटर क्षमतेचे प्लॅस्टिकचे 6 कॅन हातभट्टी दारुने भरलेले. (एकूण 210 लिटर हातभट्टी दारु), व्होल्सवॅगन कंपनीचे पोलो मॉडेलचे चारचाकी वाहन जिचा क्र. एमएच-12-एचएल-4297(वाहनाची किंमत 5 लाख रु.) जप्त करण्यात आले या जप्ती मुद्देमालाची एकूण किंमत रु. 5 लाख 22 हजार 200 रुपये इतकी आहे.

           यातील आरोपी रितीक विशाल चव्हाण, वय 27 वर्षे, रा. जेऊर ता. पुरंदर, जि. पुणे यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, आयुक्त डॉ. राजेश देशमुख, अमंलबजावणी व दक्षता महाराष्ट राज्य सह आयुक्त प्रसाद सुर्वे,

           सदरची कारवाई साहेब आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई डॉ. राजेश देशमुख,. सह. आयुक्त, अमंलबजावणी व दक्षता महाराष्ट्र राज्य मुंबई प्रसाद सुर्वे, स्नेहलता श्रीकर, प्र. विभागीय उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापुर विभाग कोल्हापूर यांचे निर्देशानुसार अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा बाबासाहेब भुतकर यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा कार्यालयाने केली. सदर कारवाईमध्ये निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजय पाटील, विजय मरोड, स.दु.नि. नितीन जाधव, जवान अजित रसाळ, विनोद हिंगणे, रमेश भुजबळ, अमित क्षीरसागर, अजित घाडगे, बाळासाहेब पाचूंदे, किरण जंगम यांनी भाग घेतला सदर गुन्ह्याचा पुढील तपास माधव चव्हाण, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा हे करीत आहेत.

   जिल्हयामध्ये बनावट दारु तसेच हातभट्टी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच इतर कोणत्याहो प्रकारच्या दारुची निर्मिती, विक्री व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ या कार्यालयास देण्यात यावी असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा बाबासाहेब भुतकर यांनी केले आहे.

0 0 0 0

संबंधित पोस्ट

गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 8,24,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

अवैध व्यवसायांविरुद्ध गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई!

गडचिरोली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!

मुंबई पोलिसांच्या कस्तुरबा मार्ग पोलिसांची CEIR कारवाई; 100 चोरीचे/हरवलेले मोबाईल हस्तगत, ₹22.70 लाखांचा मुद्देमाल 

गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ यांच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सात जहाल माओवाद्याला कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश

vishwatmaklokswamivarta

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आज कुख्यात अमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याला तुर्कीयेमधून परत आणण्यात मोठे यश मिळवले