vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

रायगड जिल्ह्यात ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज 2026’ अंतर्गत 65 उमेदवारांचे सादरीकरण,विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण संकल्पनांचे तज्ज्ञ परीक्षक मंडळासमोर सादरीकरण;उत्कृष्ट संकल्पनांचा शासनामार्फत गौरव

रायगड जिल्ह्यात ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज 2026’ अंतर्गत 65 उमेदवारांचे सादरीकरण,विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण संकल्पनांचे तज्ज्ञ परीक्षक मंडळासमोर सादरीकरण;उत्कृष्ट संकल्पनांचा शासनामार्फत गौरव

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: शासकीय सेवांमध्ये नाविन्यता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज 2026’ अंतर्गत रायगड जिल्ह्यातील एकूण 65 उमेदवारांनी आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण केले. उद्योग, संशोधन, शिक्षण, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास अशा विविध क्षेत्रांतील समस्यांवर उपाय सुचविणाऱ्या या संकल्पनांचे शासनामार्फत नियुक्त तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून परीक्षण करण्यात आले. या परीक्षणातून उत्कृष्ट ठरणाऱ्या संकल्पनांची निवड करून संबंधित उमेदवारांचा शासनामार्फत गौरव करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त श्रीकांत कोकाटे यांनी दिली.

रायगड जिल्ह्यात दि.4, 5 आणि 13 नोव्हेंबर 2026 रोजी एनआयसी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अलिबाग तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग येथे दृकश्राव्य माध्यमातून ही सादरीकरणे घेण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 65 उमेदवारांनी सहभाग नोंदविला. उमेदवारांनी आपल्या संकल्पना आणि समस्यांवरील संभाव्य उपाय तज्ज्ञ परीक्षक मंडळासमोर सादर केले.

या उपक्रमासाठी शासनामार्फत पाच परीक्षक मंडळांची नियुक्ती करण्यात आली होती. या मंडळांमध्ये शासकीय तसेच तांत्रिक क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचा समावेश होता. विविध क्षेत्रांतील समस्या आणि त्यावरील उपाययोजनांच्या नाविन्यपूर्णतेच्या अनुषंगाने उमेदवारांच्या संकल्पनांचे परीक्षण करण्यात आले. त्यातून निवडण्यात येणाऱ्या उत्कृष्ट संकल्पनांना शासनस्तरावर गौरविण्यात येणार आहे.

नागरिकांच्या प्रशासकीय समस्यांचे जलद गतीने निराकरण करणे आणि शासकीय सेवांमध्ये पारदर्शकता आणणे या उद्देशाने राज्य शासनाने दि.17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविले. या अभियानाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS) यांच्या माध्यमातून ‘राज्यस्तरीय इनोव्हेशन चॅलेंज महाराष्ट्र 2026’ हा उपक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली.

सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ अंतर्गत विविध क्षेत्रांतील समस्या, त्यांचे स्वरूप आणि त्यावरील उपाययोजनांबाबत उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात संकल्पना प्राप्त झाल्या. या संकल्पनांना तज्ज्ञ परीक्षक मंडळासमोर सादरीकरणाची संधी देऊन त्यातील उत्कृष्ट समस्या निराकरण कल्पना निवडण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण विचारांना प्रोत्साहन मिळण्यासह प्रशासकीय आणि सार्वजनिक सेवांमधील समस्यांवर उपयुक्त उपाय शोधण्यास मदत होणार आहे.

नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देऊन त्यांचे प्रत्यक्ष उपयुक्त उपाययोजनांमध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज 2026’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

0000û

०००

संबंधित पोस्ट

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनखाजगी नौकरी इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; १२ मे रोजी बुलढाण्यात रोजगार मेळावा

आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन प्रणालीद्वारे

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

बॅकींग, फायनान्स, अग्रीकल्चर, शिक्षण क्षेत्रात रोजगाराची संधी पंडित दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन 

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ.. जागतिक तणावाचा बाजारपेठेवर परिणाम; पाहा आजचे ताजे दर

vishwatmaklokswamivarta

कृषी यांत्रिकीकरण योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू