vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शनिवार २८ नोव्हेंबर रोजी एकविरा गडावर सीकेपी समाजाचा ‘एक दिवस कायस्थांचा’ मेळा

शनिवार २८ नोव्हेंबर रोजी एकविरा गडावर सीकेपी समाजाचा ‘एक दिवस कायस्थांचा’ मेळा

      ठाणे: प्रतिनिधी कार्ला येथील एकविरा गडावर यावर्षी भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम होणार आहे. निमित्त आहे ‘एक दिवस कायस्थांचा’मेळा. या निमित्ताने देशभरातील सीकेपी बांधव शनिवार दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी एकविरा गडावर जमणार आहेत.

 सीकेपी समाजाचा ‘एक दिवस कायस्थांचा’ उत्सव म्हणजे समाजाचा मेळाच आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. शिवाय ज्ञातीतील नामवंतांचाही गौरव केला जाणार आहे. या गौरव सोहळ्यासाठी विशेष पाहुणे निमंत्रित करण्यात आले आहेत. २८ नोव्हेंबर रोजी पहाटे देवीचा अभिषेक, पालखी, होमहवन, गोंधळ, भक्तीसंगीत, समाजातील नामवंतांचा पुरस्कार देवून गौरव, महाआरती इत्यांदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रम गडाच्या पायथ्याशी होणार आहेत. तसेच दादर, पुणे, बोरीवली, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आदी भागातून विशेष बसेची व्यवस्था करण्यात आली असून अनेक एकविरा भक्त २८ नोव्हेंबर रोजी एकविरा गडावर दाखल होणार आहेत.

     `एक दिवस कायस्थांचा’ या उत्सवाचे यंदा १० वे वर्ष असून या अभिनव संकल्पनेला ज्ञाती बांधवांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. यावर्षी देवीची साडेतीन शक्तीपिठे हा कार्यव्रâम वाघ्या मुरळी, गोंधळ व देवींच्या गाण्यांसह प्राची गडकरी साकारणार आहेत. या समारोहास सीकेपी समाजातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सीकेपी एकविरा देवस्थान संस्थेने केले आहे. अधिक माहिती व संपर्कासाठी ७०२१३२०१७८ व ९८२०५१८८६३ या व्रâमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

मुख्य अभियंता मृद व जलसंधारण यांचे कार्यालय कार्यान्वित

महाराष्ट्र शासनाचे ५, १३, २३ वर्ष मुदतीचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २६ एप्रिल रोजी; पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा..

शाही दसरा महोत्सवाचा भाविक – नागरिकांनी आनंद घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

vishwatmaklokswamivarta

महाड शहरातील नवीपेठ महाड पोस्ट ऑफिससाठी जागेची आवश्यकताइच्छुकांनी लेखी अर्ज सादर करावेत

सिल्लोड, सोयगावमधील पाणीपुरवठा योजनांना गती द्या!-पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा

vishwatmaklokswamivarta